Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई पालिकांच्या शाळांतील शिक्षकांचे प्रगती पुस्तक जाहीर

मुंबई प्रतिनिधी - गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी जोरकस प्रयत्न करण्यात येत असून, शिक्षकांची प्रगतीपुस्तक देखील

धोत्रे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी आरती जामदार
संगमनेरमध्ये भव्य योग शिबिराचे आयोजन
टी -२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा… धोनीचाही महत्वाचा ‘रोल’

मुंबई प्रतिनिधी – गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी जोरकस प्रयत्न करण्यात येत असून, शिक्षकांची प्रगतीपुस्तक देखील बनवण्यात येत आहे. गेल्या चार वर्षांमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतील सात शिक्षकांना विविध कारणांमुळे निलंबित करण्यात आले असून 179 शिक्षकांविरुद्ध विविध स्वरुपाच्या कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. सुमारे 87 शिक्षकांपैकी काहींवर दंडात्मक कारवाई, तर काहींची वेतनवाढ रोखण्यात आली आहे. सुमारे 92 शिक्षकांवर ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे.


ज्ञानदानात कुचराई केल्याबद्दल शिक्षकांवर निरनिराळ्या स्वरुपाची कारवाई करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे प्रगतीपुस्तक तयार करणार्‍या शिक्षकांना मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने उत्तीर्ण-अनुत्तीर्ण असल्याचा शेरा देण्यात आला आहे. प्रजा फाऊंडेशने मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतील सध्यस्थितीबाबतचा अहवाल जाहीर केला असून शिक्षकांविरोधात करण्यात आलेल्या कारवाईच्या माहितीचा त्यात आढावा घेण्यात आला आहे. शिक्षण विभागाने 2017 मध्ये जारी केलेल्या परिपत्रकानुसार शिक्षकांविरोधात कारवाई करण्यात येते. शाळा, वर्ग आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीच्या आधारे शिक्षकांचेही मूल्यमापन करण्यात येत असून उत्तम कामगिरी करणार्‍या शिक्षकांचा गौरवही करण्यात येतो, तर कामचुकार शिक्षकांची चौकशी, समज देणे, नोटीस बजावणे, दंडात्मक कारवाई, निलंबन अशा स्वरुपाची कारवाई करण्यात येते. कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक आणि शिक्षक यांचा समावेश आहे. प्रजा फाऊंडेशनने माहितीचा अधिकार कायद्याअंतर्गत अर्ज करून मिळवलेल्या माहितीच्या आधाराने तयार केलेला अहवाल जाहीर केला. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवरून शिक्षकांचे मूल्यमापन करण्यात येत असून ज्ञानदानात कुचराई करणार्‍या शिक्षकांची चौकशी केल्यानंतर दोषारोप ठेऊन कारवाई करण्यात आली आहे.  शिक्षण विभागाने 2012 ते 2018 या कालावधीत निरनिराळ्या कारणांमुळे 73 शिक्षकांची चौकशी केली होती. तर 44 शिक्षकांना निलंबित करण्यात आले होते. गेल्या चार वर्षांत हे प्रमाण कमी झाल्याचे आकडेवारीवरून आढळून आले आहे. गेल्या चार वर्षात चांगल्या गुणवत्तेमुळे 204 शिक्षकांना गौरवण्यात आले होते. तर 179 शिक्षकांविरोधात कारवाई करण्यात आली होती. सुमारे 87 शिक्षकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली, तर 92 शिक्षकांवर नोटीसा बजावण्यात आली होती. 60 शिक्षकांची चौकशी करण्यात आली आणि 7 शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे.

COMMENTS