Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पृथ्वी असेपर्यंत छत्रपती शिवरायांचा अवमान करण्याची हिंमत होऊ नये बावनकुळे यांची अपेक्षा

भाजपला लक्ष्य केल्याचा दावा

अहमदनगर प्रतिनिधी - छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान कोणी करू नये व कोणाची तशी हिंमतही होऊ नये. मागच्या पिढीतही कोणात अशी हिंमत नव्हती व येणार

उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्याने शिंदे फडणवीस सरकार कायदेशीर असल्याचे सुप्रीम कोर्टाचे म्हणणे – चंद्रशेखर बावनकुळे 
शिंदे-फडणवीस दररोज १८-१८ तास काम करतात 
’आषाढी’निमित्त टोल वसुली पुढे ढकला

अहमदनगर प्रतिनिधी – छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान कोणी करू नये व कोणाची तशी हिंमतही होऊ नये. मागच्या पिढीतही कोणात अशी हिंमत नव्हती व येणारी हजार-दोन हजार वर्षे, किंबहुना पृथ्वी असेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान कोणी करू नये व कोणाची तशी हिंमतही होऊ नये, अशी अपेक्षा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे व्यक्त केली. दरम्यान, व्हीडीओ काटकूट करून व काही व्हीडीओ चुकीच्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात दाखवण्यातून केवळ भाजपला बदनाम करण्याचे, काऊंटर करण्याचे व क्रिटीसाईज करण्याचे काम सुरू आहे, असा दावाही त्यांनी केला.


छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत करण्यात आलेल्या वक्तव्यांवरून वाद रंगला असताना भाजप आमदार प्रसाद लाड यांनी शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानाबाबत भाष्य करून त्यात भर घातली. यामुळे विरोधकांनी जोरदार टीका केली. भाजपची अडचण झाल्यानंतर अखेर आमदार लाड यांनी वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. या पार्श्‍वभूमीवर, लाड यांच्या वक्तव्यावरून बावनकुळे यांना प्रश्‍न विचारण्यात आला. तेव्हा ते म्हणाले, लाड यांनी आपल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच आपले वक्तव्य चुकले असल्याचंही लाड यांनी म्हटले असल्याचे बावनकुळे म्हणाले. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत असल्याने यावरही बावनकुळे यांना प्रश्‍न विचारला तेव्हा, सध्या व्हिडिओ काटछाट करून व्हायरल करण्याचा ट्रेंड सुरू आहे, असा दावा त्यांनी केला.


नगर तालुक्यातील खासगी कार्यक्रमासाठी बावनकुळे नगरला आले होते. त्यावेळी त्यांनी माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निवासस्थानी माध्यमांशी संवाद साधला. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आमदार प्रसाद लाड यांनी केलेले वक्तव्य मागे घेतले आहे व आपले वक्तव्य चुकीचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तर केंद्रीय मंत्री दानवेंच्या वक्तव्याबाबत बोलताना ते म्हणाले, व्हीडीओ काटकूट करून व चुकीच्या पद्धतीने दाखवण्याचा ट्रेंड सुरू आहे. जेव्हा जेव्हा आम्ही सत्तेत आलो, तेव्हा आमच्या शीर्ष नेतृत्वाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातून प्रेरणा घेऊनच काम केलेले आहे. त्यामुळे भाजपला लक्ष्य करण्यासाठी काही व्हिडिओ कटछाट करून आणले जातात, असा दावा बावनकुळे यांनी केला.


भाजपचे 100 टक्के कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांना मानूनच काम करतात. देशातील 18 कोटी व महाराष्ट्रातील अडीच कोटी भाजप कार्यकर्ते छत्रपती शिवरायांची प्रेरणा, ऊर्जा व इतिहास घेऊनच काम करतात, असा दावा करून बावनकुळे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान हा कोणीही करू नये. मागच्याही पिढीमध्ये कुणाची छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याची हिंमत नव्हती आणि पुढच्या हजार-दोन हजार वर्षांत, अगदी पृथ्वी आहे तोपर्यंत कुणी त्यांचा अवमान करू नये व करण्याची कोणाची हिंमत होऊ नये. तसेच, अशा पद्धतीने कोणाचे वक्तव्य असेल तर त्याचे समर्थन भाजप करू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

त्यांचे स्वतःपुरते सरकार – देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र यांना जोडणार्‍या समृद्धी महामार्गाचे स्वप्न पाहिले होते. आता या महामार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या अकरा तारखेला करीत आहेत. या महामार्गामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे चित्र बदलणार आहे. खरे तर हा विकास याआधीच करता आला असता. 50-60 वर्षे ज्यांनी सरकार चालवलेय, त्यांनी केवळ स्वतःपुरतेच सरकार चालवले. सत्तेपासून पैसा व पैशापासून सत्ता एवढेच धोरण मागील सरकारचे राहिले. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात जो विकास झाला, त्यामुळे हा महाराष्ट्र बदलणार आहे. मागच्या अडीच वर्षाचा व येत्या दोन वर्षाचा विकास गतीमान करून महाराष्ट्र मागच्या अडीच वर्षात जो दहाव्या क्रमांकावर गेला होता, तो एक नंबरवर आणण्याची क्षमता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात आहे, असा दावा बावनकुळे यांनी केला. दरम्यान, भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या दिल्लीच्या बैठकीत भाजपची पुढची रणनीती ठरवली जाणार आहे व या बैठकीसाठी पंकजा मुंडे, विनोद तावडे हे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली.

COMMENTS