Homeताज्या बातम्यादेश

छत्तीसगडमध्ये ऑक्सिजन अभावी 4 बालकांचा मृत्यू

रायपूर वृत्तसंस्था : छत्तीसगडच्या अंबिकापूर जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्सिजनअभावी 4 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली

तराफे वाचवण्याच्या नादात तरुणाचा नदीत बुडून दुर्दैवी अंत.
बहुरंगी लढतींमागे कोण : फडणवीस की पवार ! 
महाविकास आघाडी तात्पुरती ; काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे स्पष्टीकरण

रायपूर वृत्तसंस्था : छत्तीसगडच्या अंबिकापूर जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्सिजनअभावी 4 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या सर्व बालकांना मेडिकल कॉलेज हॉस्पिटलच्या एसएनसीयू वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे रविवारी रात्री उशिरा ही घटना घडल्याची माहिती पुढे आली.
अंबिकापूरच्या एसएनसीयू वार्डात रविवारी रात्री 4 तास वीजपुरवठा खंडित झाल्याने व्हेंटिलेटरचा ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाला, मात्र वैद्यकीय महाविद्यालय व्यवस्थापनाने दखल घेतली नसल्याचा आरोप मृत मुलांच्या नातेवाईकांनी केला आहे. दुसरीकडे, वैद्यकीय महाविद्यालय व्यवस्थापनाने मृत मुलांच्या नातेवाईकांचे आरोप फेटाळून लावले. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे कोणतीही अडचण आली नसल्याचे वैद्यकीय महाविद्यालय व्यवस्थापनाने सांगितले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अंबिकापूरचे जिल्हाधिकारीही रुग्णालयात पोहोचले. घटनेची चौकशी सुरू असल्याचे जिल्हाधिकारी कुंदन कुमार यांनी सांगितले. माहिती मिळताच आरोग्यमंत्री टीएस सिंहदेव यांनी देखील रुग्णालयाला भेट देऊन चौकशी पथक स्थापन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

COMMENTS