Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोल्ट्री धारकांचे प्रलंबित प्रश्‍न सोडवू

पशुसंवर्धनमंत्री विखे यांचे अनिल खामकर यांना आश्‍वासन

अकोले प्रतिनिधी - राज्यातील 36 जिल्ह्यातील 9 लाख पोल्ट्री धारकांचे शोषण होऊ नये या दृष्टीने त्यांच्या विविध प्रश्‍न समजावून घेऊन सर्व मागण्या राज

पीक विमा कंपन्यांबाबत कठोर निर्णय घेण्याची वेळ ;महसूलमंत्री राधाकृष्ण विखे -पाटील
बदलीच्या ठिकाणी हजर न होणार्‍या अधिकार्‍यांची सेवा खंडित करणार
एसडीआरएफ जवानांच्या कुटुंबियांना दहा लाखांची मदत

अकोले प्रतिनिधी – राज्यातील 36 जिल्ह्यातील 9 लाख पोल्ट्री धारकांचे शोषण होऊ नये या दृष्टीने त्यांच्या विविध प्रश्‍न समजावून घेऊन सर्व मागण्या राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पा.यांनी मान्य केल्या असून त्या लवकर सोडविण्यात येतील असे आश्‍वासन त्यांनी दिल्याची माहिती महाराष्ट्र राज्य पोल्ट्री योध्दा फेडरेशनचे अध्यक्ष अनिल खामकर व प्रवक्ते बाळासाहेब कानवडे यांनी दिली.
विधान भवन, पुणे येथे राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांच्या अध्यक्षतेखाली व आयुक्त पशुसंवर्धन यांचे प्रमुख उपस्थितीत पोल्ट्रीधारकांच्या प्रश्‍नासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीसाठी कंपन्यांचे प्रतिनिधी, संघटनेचे प्रतिनिधी व पोल्ट्री व्यवसायिकांचे प्रतिनिधी, बँकर्सचे प्रतिनिधी हे उपस्थित होते. यावेळी पोल्ट्री धारकांच्या संघटनेने मागण्या बैठकीत मांडल्या.त्या सर्व मागण्या बाबत सविस्तर चर्चा करून खालील मागण्या मान्य करण्यात आल्या. कुकुटपालनासाठी वापरण्यात येणार्‍या जमिनीवर फक्त कृषिक आकारणी करावी.  कॉन्ट्रॅक्ट फॉर्मिंग व खाजगी फॉर्मिंग तसेच अंडे उत्पादन करणान्या शेतकर्‍यांचे शोषण होवू नये, म्हणून उपाययोजना करावी. पोल्ट्रीसाठी लागणारे विज बिल आकारणी ही कृषी पंपाच्या दराने करावी, कंपनी देण्यात येणारी पिले व खाद्य यांचा दर्जा तपासण्यासाठी प्रयोगशाळेची निर्मिती करावी. या पोल्ट्री संघटनेच्या मागण्या राज्याचे पशुसंवर्धन मंत्री ना.राधाकृष्ण विखे पा.यांनी मान्य केल्या. यावेळी महाराष्ट्र राज्य पोल्ट्री योध्दा फेडरेशनचे मुख्य प्रवक्ते बाळासाहेब कानवडे यांनी या चर्चेत भाग घेऊन आपल्या मागण्या कशा रास्त आहेत. हे मंत्री महोदयांना पटवून देण्यात यशस्वी झाले. या यशासाठी पोल्ट्री संघटनेचेअनिल खामकर, श्री साळवी, सर्जेराव भोसले, बाळासाहेब देशमुख, गोंडाबे, गोपाळे गुरुजी, बाळासाहेब कानवडे, लसने, जितू साबळे, दीपक शेवंते आदिसह अनेक नेत्यांनी संघटनेची बांधणी करून महत्वपूर्ण योगदान दिले.

COMMENTS