Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पळशी-सिध्देश्‍वर कुरोली रस्ता खुला करण्याची मागणी; रस्त्यात चरी खणल्याने लोकांची गैरसोय; न्याय देण्याची मागणी

औंध / वार्ताहर : खटाव तालुक्यातील पळशी येथील पळशी-सिध्देश्‍वर कुरोली रस्त्यात चरी खणल्याने लोकांची गैरसोय होत असून वारंवार मागणी करूनही प्रशासक

प्रकाशच्या स्टाफवर दाखल गुन्हे राजकीय सुडबुध्दीने : मकरंद देशपांडे
अर्थसंकल्पातील विकासाची पंचसूत्री राज्याला प्रगतीपथावर नेईल : ना. मंत्री जयंत पाटील यांचा विश्‍वास
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात बिबट्यासह 308 श्‍वापदांची नोंद

औंध / वार्ताहर : खटाव तालुक्यातील पळशी येथील पळशी-सिध्देश्‍वर कुरोली रस्त्यात चरी खणल्याने लोकांची गैरसोय होत असून वारंवार मागणी करूनही प्रशासकीय पातळीवरून सहकार्य होत नसून 100 कुटुंबाचा ये-जा करण्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.
याबाबत तेथील ग्रामस्थांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की पळशी-सिध्देश्‍वर कुरोली ग्रा. म.218 हा 60 वर्षांपासून वहीवाटीचा रस्ता आहे. हा रस्ता जाणीवपूर्वक बेकायदेशीरपणे बंद करून लोकांची गैरसोय करण्यात येत आहे. या रस्त्यावर दोन वेळा खडीकरणाचा शासकीय निधी पडला आहे. यापूर्वी एकदा असाच रस्ता बंद करण्यात आला होता. त्यावेळी तत्कालीन तहसीलदार यांनी रस्ता खुला करून दिला होता.
याबाबत काही दिवसांपूर्वी खटाव तहसीलदार यांनाही निवेदन देण्यात आले होते. जि. प. बांधकाम विभागाला यामध्ये लक्ष घालण्यासंदर्भात कळविले होते. मात्र, बांधकाम विभागाने काहीही कार्यवाही केली नाही. चर खणणार्‍या व्यक्तीच्या जवळच्या लोकांची अवजड वाहतूक करायची असेल तर हा रस्ता तात्पुरता खुला केला जातो. त्यानंतर जैसे थे चरी काढण्यात येतात. त्यामुळे कोणी ’रस्ता देता का रस्ता’ अशी म्हणण्याची वेळ या लोकांच्यावर आली आहे. दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात सुमारे पासष्ट नागरिकांच्या सह्या आहेत.

COMMENTS