एकविसाव्या शतकात देखील बालविवाह प्रथा सुरूच

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एकविसाव्या शतकात देखील बालविवाह प्रथा सुरूच

अल्पवयीन युवती ९ महिन्याची गर्भवती असल्याचा प्रकार समोर पोलिसांनी २० वर्षीय आरोपी अमित पवार याला अटक केली

अमरावती प्रतिनिधी - आजही बालविवाह सुरू असल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. अमरावतीच्या खोलापुर पोलीस स्टेशन अंतर्गत १७ वर्षीय अल्पवयीन युवती ९ महिन

सार्वजनिक शांतता बिघडवणार्‍या 13 जणांविरूद्ध गुन्हा
लॉन टेनिसमध्ये महाराष्ट्राला सुवर्णपदक; आकांक्षा निठुरेकडून कर्नाटकची मयुरी पराभूत
सीमाप्रश्‍नांचा वाढता गुंता

अमरावती प्रतिनिधी – आजही बालविवाह सुरू असल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. अमरावतीच्या खोलापुर पोलीस स्टेशन अंतर्गत १७ वर्षीय अल्पवयीन युवती ९ महिन्याची गर्भवती असल्याचा प्रकार पुढे आला आहे. युवती प्रसूती करिता जिल्हा स्त्री रुग्णालयात आल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी २० वर्षीय आरोपी अमित पवार विरुद्ध अत्याचार आणि पोस्को अंतर्गत गुन्हा नोंदवून आरोपीस अटक केली आहे. आरोपी अमित आणि अल्पवयीन युवती नातेवाईक आहेत. २०२१ मध्ये त्यांचा बालविवाह झाला असल्याचा प्रकार देखील उघडकीस आला आहे आणि यातूनच अल्पवयीन युवती गर्भवती झाली असल्याच पोलीस तपासात पुढे आलेलं आहे. त्यामुळे एकविसाव्या शतकात देखील बालविवाह प्रथा सुरू असल्याचं उघड झालं आहे.

COMMENTS