Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल बुधवारी सपत्नीक श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले.

यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते.

शिर्डी प्रतिनिधी - कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीच्या जत तालुक्यातील 40 दुष्काळग्रस्त गावांनी कर्नाटक राज्यात सामील होण्याचा ठर

अपघाताला कारणीभूत ठरणारे ब्लॅक स्पॉट तातडीने दूर करावेत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
भंडारा रोड ते भंडारा शहर पर्यंत मेट्रो रेल्वे सुरू करण्यास तत्वत: मान्यता – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस ; जागा वाटपाचा घोळ कायम

शिर्डी प्रतिनिधी – कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीच्या जत तालुक्यातील 40 दुष्काळग्रस्त गावांनी कर्नाटक राज्यात सामील होण्याचा ठराव मंजूर केला होता. या गावांचा कर्नाटक राज्यात समावेश करण्याबाबत गांभीर्याने विचार करत असल्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघत असतांनाच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाणार नसल्याची ग्वाही दिली आहे. सांगली तालुक्यातील गावांचा प्रश्‍न पाणी टंचाईचा होता, आता तेथील पाणी टंचाई दुर झाली आहे. कर्नाटक- महाराष्ट्राच्या राज्यपालांची एकत्रितल बैठक झाली असून उभय राज्यांतील सीमावाद समोपचाराने सोडवू अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. ते बुधवारी माध्यमांशी शिर्डी येथे बोलत होते.
मुख्यमंत्री शिंदे यांनी सपत्नीक घेतले श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. यावेळी बोलतांना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, साई बाबांकडे मागायचे काय? त्यांना सर्व माहित आहे. महाराष्ट्रातील जनतेला सुख समाधान लाभावे हेच महत्वाचे. कामाक्षी देवीच्या दर्शनाआधी साईबाबांनी बोलाविले आहे. यात केंद्रही सकारात्मक भूमिका घेईल. याविषयी दोन राज्यपालांच्याही दोन बैठका झाल्या आहेत. सीमावर्ती भागातील मराठी बांधवांना काही योजना मिळत होत्या त्यात आम्ही आणखी सुधारणा केल्या आहेत. त्या भागातील लोकांचा फायदा व्हावा ही आमची भूमिका आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, कर्नाटकचे राज्यपाल आणि महाराष्ट्राच्या राज्यपालांची बैठकही झाली आहे. सीमावर्ती भागातील लोकांना आणखी काही लाभ देणार आहोत. कामाख्य देवीच्या दर्शनासाठी आम्ही जाणार आहोत यात कसलेही दुमत नसल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.  

सीमावादाचा प्रश्‍न सामोपचाराने सोडवण्याची भूमिका – सांगलीच्या जत तालुक्यातील गावे कर्नाटकात समाविष्ट करण्याची मागणी 2012 मधील आहे. तेव्हा जतमध्ये पाणी टंचाई होती. आपण बर्‍याच योजना केल्या आहेत. योजना मार्गी लावतोय. पाण्यावाचून कुठलेही गाव इकडे-तिकडे जाणार नाही. ते कर्नाटकात जाणार नाही याची जबाबदारी आमची असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. आमची बैठक काल परवाच झाली. जो सीमेचा जुना वाद आहे तो न्यायालयात आहे. हा विषय सामोपचाराने सोडवण्याची आमची भूमिका असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

COMMENTS