भरधाव डंपर आणि दुचाकी यांच्यात जोरदार धडक

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भरधाव डंपर आणि दुचाकी यांच्यात जोरदार धडक

या अपघातामध्ये दोन्ही बाईक डंपरखाली आल्या

बोरिवली प्रतिनिधी - महाराष्ट्रातील रस्ते अपघाताचं सत्र सुरुच आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरातील बोरिवलीत रात्री उशिरा भीषण अपघात घडला. एका डंपर आणि दो

नेपाळमधील पर्यटकांच्या बसचा अपघात, 43 प्रवासी जखमी
समृद्धीवरील अपघातात दोन डॉक्टरासह 3 जणांचा मृत्यू
मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघात

बोरिवली प्रतिनिधी – महाराष्ट्रातील रस्ते अपघाताचं सत्र सुरुच आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरातील बोरिवलीत रात्री उशिरा भीषण अपघात घडला. एका डंपर आणि दोन दुचाकी यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातामध्ये दोन्ही बाईक डंपरखाली आल्या. त्यामुळे अपघाताची तीव्रता आणखी वाढली. दोन दुचाकीस्वार या भीषण अपघातामध्ये गंभीररीत्या जखमी झाले. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नेमका हा अपघात कशामुळे घडला हे कळू शकलेलं नाही. याप्रकरणी  पुढील तपास पोलीस करत आहेत .

COMMENTS