सातारा जिल्हा लॉक-अनलॉकसंदर्भात आज निर्णय : शेखर सिंह

Homeमहाराष्ट्रसातारा

सातारा जिल्हा लॉक-अनलॉकसंदर्भात आज निर्णय : शेखर सिंह

कोरोना संसर्गाचा धोका ओळखून राज्य शासनाने जिल्ह्यांचे पहिला व दुसरा स्तर रद्द करून संबंधित जिल्ह्यांचा तिसर्‍या स्तरात समावेश केला आहे.

भीषण अपघात; कार थेट दरीत कोसळली, पाच जणांचा मृत्यू | LOKNews24
सुनील उकर्डे यांना सांदिपणी गुरुकुलचा आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार
आजचे राशीचक्र रविवार,२१ नोव्हेंबर २०२१ अवश्य पहा | LokNews24

सातारा / प्रतिनिधी : कोरोना संसर्गाचा धोका ओळखून राज्य शासनाने जिल्ह्यांचे पहिला व दुसरा स्तर रद्द करून संबंधित जिल्ह्यांचा तिसर्‍या स्तरात समावेश केला आहे. कोरोना पॉझिटिव्हिटी रेटनुसार ठरवला जाणारा जिल्ह्याचा स्तर यापुढे कोरोना आरटीपीसीआर रिपोर्टवर ठरवला जाणार आहे. सध्या कोणतेही निर्बंध वाढवले जाणार नसले तरी लॉक-अनलॉकसंदर्भात चार दिवसांत निर्णय घेणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली.

जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले, जिल्ह्याच्या कोरोना परिस्थितीचा विचार करता जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून प्रमाण कमी झाले. त्यानंतर दुसर्या व तिसर्या आठवड्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण 7.02 टक्क्यांपेक्षाही कमी राहिले. त्यानंतर 25 व 26 जून रोजी कोरोना संसर्ग वाढल्याचे दिसून आले. दोन दिवसांचा पॉझिटिव्हिटी रेट 8 ते 8.5 तर टेस्टिंगचा दर 12 ते 13 टक्के दरम्यान दिसून आला. कोरोना संसर्ग आणि रुग्णांनी व्यापलेल्या ऑक्सिजन बेडची टक्केवारी यांचा विचार करून शासनाने राज्यातील जिल्ह्यांचे पाच स्तर केले होते. दहा दिवसांपूर्वी जिल्ह्याचा समावेश तिसर्‍या स्तरात झाला असून त्यासंदर्भात आदेश काढण्यात आले. 

जिल्ह्यात अत्यावश्यक सेवांसोबत आवश्यक आस्थापना सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली. कापड दुकाने, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक साहित्य दुकाने सुरु झाली. तसेच रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेत सुरु झाली.

जिल्हा सुरु करताना प्रशासनातर्फे दुकानांत गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले होते. निर्बंध कमी केल्यानंतर मार्केट असोसिएशन, दुकानदार यांच्याकडून अपेक्षित काळजी घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. कोरोना संसर्ग असाच वाढला आणि हे प्रमाण 10 टक्क्यांवर गेल्यास स्तरामध्ये वाढ करुन काही निर्बंध घालावे लागतील. याचा अर्थ लगेचच लॉकडाऊन करणार नसल्याचे सांगून शेखर सिंह म्हणाले, गुरुवारी यासंदर्भात लोकप्रतिनिधींशी चर्चा केली जाणार आहे. आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक घेतली जाणार आहे. सध्या खरिप हंगाम सुरु असल्याने हालचाल वाढली आहे. कृषी दुकानात खते, बियाणे, औषधांना परवानगी असून त्या ठिकाणी गर्दी होत असल्याचे दिसते. संबंधित दुकानदारांनी यासंदर्भात उपाययोजना करणे आवश्यक आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास सबंधित ग्राहक आणि दुकानदारांवर कारवाई करण्यात येणार आहे. सतत नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास दुकान सील केले जाणार आहे. रेस्टारंट चालकांनी ग्राहकांच्या 50 टक्के क्षमतेतच ते चालवणे आवश्यक आहे. जादा लोक दिल्यास कारवाई होणार, असा इशाराही शेखर सिंह यांनी दिला.

COMMENTS