महाराष्ट्राच्या वाट्याला चार मंत्रिपदे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्राच्या वाट्याला चार मंत्रिपदे

राणे, पाटील, पवार, कराड यांनी घेतली केंद्रीय मंत्रिपदाची शपथनवी दिल्ली: मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला आहे. आज महा

बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण ; राणेंनी अभिवादन केल्यानंतर गोमुत्र शिपंडत केला दुग्धाभिषेक
Raut : नारायण राणे प्रकरणात अमित शहांची एंट्री : शिवसेनाही तयारीत… संजय राऊतांना मुंबई | LOK News24
महाराष्ट्रातून एक कॅबिनेट व तीन राज्यमंत्री

राणे, पाटील, पवार, कराड यांनी घेतली केंद्रीय मंत्रिपदाची शपथ
नवी दिल्ली: मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला आहे. आज महाराष्ट्रातील नारायण राणे, कपिल पाटील, भारती पवार, डॉ. भागवत कराडयांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आज 43 मंत्र्यांचा शपथविधी झाला. त्यात 11 महिलांचा समावेश आहे. नव्या विस्तारात उत्तर प्रदेशाच्या वाट्याला सर्वाधिक सात मंत्रिपदे गेली आहेत. तर महाराष्ट्राच्या वाट्याला चार मंत्रिपदं आली आहेत. त्यात नारायण राणे यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं आहे. आज संध्याकाळी 6 वाजता राष्ट्रपती भवनात हा शपथविधी सोहळा पार पडला. सर्वात आधी नारायण राणे पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 43 नेत्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. नारायण राणे, भारती पवार, कपिल पाटील आणि डॉ. भागवत कराड या महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी हिंदीत आणि ईश्वर साक्षीने शपथ घेतली. कोकणात शिवसेनेला शह देण्यासाठी आणि भाजपचा अधिक प्रसार करण्यासाठी नारायण राणे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. तसंच आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांचा भाजपला मोठा फायदा होऊ शकतो. राज्यात ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. अशावेळी भागवत कराड यांनी संधी देण्याचं काम भाजपनं केलंय. भागवत कराड हे मराठवाड्यातील ओबीसीचे मोठे नेते आहेत. सध्या ओबीसी आरक्षण याचा विचार केल्यास ओबीसी नेत्यांना सोबत ठेवण्याचा काम भाजपने केलं. तसंच भागवत कराड यांना मंत्रीपद दिल्यानं मराठवाड्यात भाजपाची ताकद वाढणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदलात एकूण 43 जणांना आज मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. त्यात 11 महिलांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील दिंडोरीच्या खासदार भारती पवार यांना संधी देण्यात आली आहे. भारती पवार या सुशिक्षित महिला लोकप्रतिनिधी आहे.

COMMENTS