शिराळा / प्रतिनिधी : शिराळा तालुक्यात भात काढणी गतीने सुरू असुन यंदा समाधानकारक पाऊस झाल्यामुळे भाताचे उत्पन्न सरासरीपेक्षा वाढले आहे. साहजिकच

शिराळा / प्रतिनिधी : शिराळा तालुक्यात भात काढणी गतीने सुरू असुन यंदा समाधानकारक पाऊस झाल्यामुळे भाताचे उत्पन्न सरासरीपेक्षा वाढले आहे. साहजिकच शेतकर्याचा आर्थिक स्तर उंचावणार आहे. दरम्यान, तालुक्यातील आरळा येथील प्रगतशील शेतकरी संजय देशपांडे यांनी 30 गुंठे क्षेत्रात गोविंद भोग या भात जातीचे वाण करून विक्रमी उत्पादन घेतले आहे. त्यांनी 30 गुंठे क्षेत्रात सव्वा दोन लाखाचे उत्पन्न मिळविले. त्यामुळे शेतकर्यांच्यात उत्साहाचे वातावरण आहे.
कृषी विभागातर्फे तालुक्यात अनेक ठिकाणी देसी वाण घेण्यासाठी शेतकर्यांना मार्गदर्शन केले जात आहे. त्याचा फायदा अनेक शेतकर्यांना होत आहे. गोविंद भोग हे भात पेरणीसाठी पश्चिम बंगालमधून उपलब्ध करण्यात आले आहे. धूळ वाफ पध्दतीने व टोकन तसेच बांडग्यातून पेरणी केली जाते. भात पिकाची उंची साडेतीन ते चार फूट आहे. पेरणी करताना प्रत्येकी चार इंचावर एक बी पेरण्यात आले. त्याचा फुटवा चांगला असून प्रत्येक बियाणाला दहा ते बारा काड्याचा फुटवा आहे. हे भाताचे वाण 120 दिवसाचे असल्याने परिसरात उत्पादन पाहून चर्चेचा विषय ठरत आहे. विक्रमी उत्पादन होत असल्यामुळे यापुढे या वाणाला मागणी वाढणार असे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले.
COMMENTS