Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आक्षेपार्ह भाषण केल्याबद्दल भाजपच्या नेत्यावर गुन्हा दाखल

सातारा / प्रतिनिधी : धर्माबद्दल अपशब्द वापरत चिथावणीखोर भाषण केल्याबद्दल भाजपच्या नेत्यावर वाठार स्टेशन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विक्र

नक्षलग्रस्त भागात गडचिरोली पोलीस दलाचे कार्य कौतुकास्पद : ना. शंभूराज देसाई
कराड शहरात काही तासात 4 टन कचरा गोळा
कराड येथील महिलेच्या खूनाचा उलगडा

सातारा / प्रतिनिधी : धर्माबद्दल अपशब्द वापरत चिथावणीखोर भाषण केल्याबद्दल भाजपच्या नेत्यावर वाठार स्टेशन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विक्रम विनायक पावसकर (रा. सोमवार पेठ, कराड) असे त्यांचे नाव असून ते भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष होते.
चार ऑक्टोंबरला वाठार येथील सार्वजनिक दुर्गा माता नवरात्र उत्सवात पावसकर यांनी भाषण केले. यादरम्यान त्यांनी बोलताना मुस्लिम धर्माबद्दल अपशब्द वापरत हिंदू-मुस्लिम धर्मांत तेढ निर्माण करणारे शब्द वापरले. त्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या आहेत, असे निदर्शनास आणून देऊन धार्मिक व सार्वजनिक शांतता बिघडवण्याचे काम केल्याने पावसकर यांच्या विरूध्द हमीदखान नूरखान पठाण (वय 67, रा. वाठार स्टेशन) यांनी गुन्हा दाखल केला आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 153 (अ) नुसार तक्रार दिली आहे. वाठार पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला असून पोलीस निरीक्षक एस. एस. बनकर तपास पुढील करत आहेत.

COMMENTS