उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील कारला भीषण अपघात

Homeताज्या बातम्यादेश

उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील कारला भीषण अपघात

ताफ्यातील एका कारने रुग्णवाहिकेला जोरदार धडक दिली यामध्ये २ पोलिसांसह दोन डॉक्टर आणि इतर दोन जण जखमी झाले

   उत्तरप्रदेश प्रतिनिधी/- उत्तरप्रदेशा(Uttar Pradesh) तून एक धक्कादायक घटना समोर आली. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक(Deputy Chief Minis

दोन डबल डेकर बसमध्ये भीषण अपघात.
भरधाव बसची कंटेनरला धडक; 6 ठार .
भरधाव कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू

   उत्तरप्रदेश प्रतिनिधी/– उत्तरप्रदेशा(Uttar Pradesh) तून एक धक्कादायक घटना समोर आली. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक(Deputy Chief Minister Brijesh Pathak) हे एका राजकीय दौऱ्यानिमित्त लखनौ येथून लखीमपूर खेरीच्या दिशेने निघाले होते. ब्रिजेश पाठक यांचा ताफा सीतापुर नजीक आला असताना, ताफ्यातील एका कारने रुग्णवाहिकेला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये २ पोलिसांसह दोन डॉक्टर आणि इतर दोन जण जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच, स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातात जखमी झालेल्या पोलिसांसह डॉक्टरांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

COMMENTS