कर्जत प्रतिनिधी :- कर्जत तालुक्यातील राशीन येथील श्री जगदंबा देवीच्या पालखी दर्शनासाठी लाखो भाविक आले होते. या गर्दीचा फायदा घेऊन चोरटे चो-या करत

कर्जत प्रतिनिधी :- कर्जत तालुक्यातील राशीन येथील श्री जगदंबा देवीच्या पालखी दर्शनासाठी लाखो भाविक आले होते. या गर्दीचा फायदा घेऊन चोरटे चो-या करतात. त्या अनुषंगाने कर्जत पोलीस स्टेशन(Karjat Police Station)कडून पालखीच्या मागे, पुढे व पालखी सोबत सतर्क पोलीस बंदोबस्त साध्या वेशात व वर्दीमध्ये ठेवण्यात आला होता.
बंदोबस्त दरम्यान चोर्याचा प्रयत्न करणार्या चोरट्यांवर कर्जत पोलिसांनी लक्ष ठेवत सहा चोरटे ताब्यात घेतले. राहुल बापू जाधव, वय 21 रा. दुधनी ता. अक्कलकोट, कृष्णा अर्जुन जाधव, वय 23, रा. सादे, ता. करमाळा, प्रकाश हिरामन डुकळे, 19 रा. चौफुला ता. हवेली, शिवाजी भगवान माने, 27 रा. देऊळगाव, ता. परांडा जि. उस्मानाबाद, अजित महेंद्र शिंदे, 19 रा. पारेवाडी ता. परांडा व पिल्या सवर्या काळे, 20 रा. नेरले, ता. परांडा, जि. उस्मानाबाद यांना ताब्यात घेतले. पोलीस स्टेशनला त्यांच्यावर चोरीचा प्रयत्न तसेच चोरीच्या उद्देशाने संशयितरित्या पालखी उत्सवात फिरणे असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे चोरटे पकडल्यामुळे मोठ्या प्रमाणात होणा-या चो-यांवर पोलीसांना नियंत्रण करता आले. उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सपोनि सतिष गावीत, पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, अमरजित मोरे, अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार मारुती काळे, अंकुश ढवळे, संभाजी वाबळे, अमोल लोखंडे, शाम जाधव, भाऊसाहेब काळे, संपत शिंदे, गोवर्धन कदम, सुनिल खैरे, संपत शिंदे, अर्जुन पोकळे, मनोज लातुरकर महादेव कोहक, सचिन वारे, ईश्वर माने यांनी ही कारवाई केली.
COMMENTS