आर्थिक गुन्हे शाखेकडे आता दहा कोटींच्या पुढची प्रकरणे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आर्थिक गुन्हे शाखेकडे आता दहा कोटींच्या पुढची प्रकरणे

मुंबई/प्रतिनिधीः मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. कोट्यवधींच्या उलाढालीबरोबरच मुंबईत आर्थिक गैरव्यवहार, घोटाळे तितकेच मोठया प्रमाणात

‘तुझे लग्न दुसरीकडे कसे होते ते मी बघतेच ; प्रेयसीच्या धमकीने प्रियकराची आत्महत्या I LOKNews24
निवडणूक निकालानंतर जल्लोषावर बंदी : निवडणूक आयोग
छत्रपती शिवराय कल्याणकारी राजे होते – आ.आशुतोष काळे

मुंबई/प्रतिनिधीः मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. कोट्यवधींच्या उलाढालीबरोबरच मुंबईत आर्थिक गैरव्यवहार, घोटाळे तितकेच मोठया प्रमाणात होत असतात. याचा तपास करण्यासाठी असलेल्या मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे यापुढे दहा कोटींपेक्षा अधिक रकमेची प्रकरणे सोपविण्यात येणार आहेत. याआधी ही मर्यादा सहा कोटी रुपये होती. मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी हा निर्णय घेतला असून त्याखालील रकमेची प्रकरणे स्थानिक पोलिस ठाण्यात दाखल केली जाणार आहेत.

आर्थिक उलाढालींप्रमाणेच आर्थिक गुन्ह्यांमध्येही मुंबई नेहमीच पहिल्या क्रमांकावर असते. शेअर बाजारातील गुंतवणुकीपासून, बँकांमधील गैरव्यवहार ते सर्वसामान्यांची फसवणूक असे गुन्हे मुंबईत मोठ्या प्रमाणात घडत असल्याने यासाठी विशेष शाखा म्हणून आर्थिक गुन्हे शाखा सुरू करण्यात आली. गुन्ह्यांची व्याप्ती सहा कोटी रुपये किंवा त्यापेक्षा अधिक असेल, तर तो गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे पाठविण्यात येत होता; मात्र आता ही मर्यादा दहा कोटी करण्यात आली आहे. दहा कोटींपेक्षा कमी रकमेची प्रकरणे स्थानिक पोलिस ठाण्यात दाखल केली जातील आणि पोलिस उपायुक्त तसेच अतिरिक्त पोलिस आयुक्तांचे त्या प्रकरणाच्या तपासावर नियमित लक्ष असेल. तांत्रिकदृष्टया काही किचकट आर्थिक घोटाळे असल्यास आणि ते दहा कोटींपेक्षा कमी रकमेचे असल्यास ते पोलिस आयुक्तांच्या परवानगीने तपासाकरिता आर्थिक गुन्हे शाखेकडे पाठविण्यात येणार आहे. पोलिस ठाण्यातील कोणत्याही आर्थिक गुन्हयांचा आढावा आर्थिक गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त घेऊ शकतात, असे आयुक्त हेमंत नगराळे यांनी आदेशात म्हटले आहे.

COMMENTS