Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वर्धा जिल्ह्यात सर्प दंशाने सर्पमित्राचा मृत्यू

शांत काशीनाथ काकडे असे मृत्यू झालेल्या सर्पमित्राचे नाव

वर्धा प्रतिनिधी - वर्ध्यात सर्पदंशाने सर्पमित्राचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मण्यार जातीच्या सापाला पकडल्यावर त्याच्याशी खेळ क

गोळीबाराचे आदेश देणार्‍यांना मराठवाड्यात बंदी घाला
बैलगाडी शर्यतीला कोर्टाची मान्यता : आ. सदाभाऊ खोत यांची बैलगाडीतून मिरवणूक
रुईगव्हाणच्या सरपंचपदी इंदिरा निलेश पवार बिनविरोध

वर्धा प्रतिनिधी – वर्ध्यात सर्पदंशाने सर्पमित्राचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मण्यार जातीच्या सापाला पकडल्यावर त्याच्याशी खेळ करणे सर्पमित्राच्या जीवावर बेतले आहे. वर्ध्याच्या सानेवाडी येथील प्रशांत काशीनाथ काकडे असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. घटनेचा व्हिडिओ समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. व्हिडिओमध्ये हा व्यक्ती विषारी मण्यारसोबत खेळताना दिसतो. सापाशी खेळत असताना डाव्या हाताच्या बोटाला मण्यारने दंश केला. मात्र, या दंशाविषयी सर्पमित्राला कळालेही नाही आणि यात त्याचा मृत्यू झाला.

COMMENTS