नवरात्रोत्सवापूर्वीच फाल्गुनी पाठकच्या गरबा-दांडिया कार्यक्रमाविरोधात याचिका दाखल

Homeताज्या बातम्यामनोरंजन

नवरात्रोत्सवापूर्वीच फाल्गुनी पाठकच्या गरबा-दांडिया कार्यक्रमाविरोधात याचिका दाखल

गणेशोत्सवाप्रमाणे यंदा नवरात्रोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होणार आहे. प्रसिद्ध गायिका फाल्गुनी पाठक(Falguni Pathak) मुंबईत गरबा-दांडिया कार्यक्रमांसा

अभियांत्रिकी विद्यार्थिनीची वसतिगृहात आत्महत्या
कोरोना नियमांचे पालन करीत मतदान करा : पंतप्रधान नरेंद्र मोदी
शिवशाही बसच्या अपघातात एकाचा मृत्यू

गणेशोत्सवाप्रमाणे यंदा नवरात्रोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होणार आहे. प्रसिद्ध गायिका फाल्गुनी पाठक(Falguni Pathak) मुंबईत गरबा-दांडिया कार्यक्रमांसाठी प्रसिद्ध आहे. यावर्षी बोरिवलीत फाल्गुनी पाठकतर्फे  नवरात्रोत्सवानिमित्त  २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीत गरबा दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, उत्सवापूर्वीच हा कार्यक्रम अडचणीत आल्याचे दिसून येत आहे. फाल्गुनी पाठकने आयोजित केलेल्या नवरात्रीच्या या कार्यक्रमाविरोधात वकील मयूर फरिया(Mayur Faria) आणि सामाजिक कार्यकर्ते विनायक सानप(Vinayak Sanap) यांनी याचिका दाखल केली आहे.

COMMENTS