भारत-ऑस्ट्रेलिया दुसऱ्या सामन्यावर पावसाचे सावट

Homeताज्या बातम्याक्रीडा

भारत-ऑस्ट्रेलिया दुसऱ्या सामन्यावर पावसाचे सावट

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान दुसरा आंतरराष्ट्रीय टी-२० सामना २३ सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे.

उपराजधानीत तब्बल तीन वर्षांच्या दीर्घकाळानंतर आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट सामना खेळला जाणार आहे. त्यामुळे नागपूरकर क्रिकेटप्रेमींमध्ये कमालीची उत्सुक

सौदी अरेबियात अमिताभ बच्चन यांनी घेतली मेस्सी-रोनाल्डोची भेट
महाराष्ट्र केसरी विजेत्यावर ना. एकनाथ शिंदे यांच्याकडून बक्षिसांचा वर्षाव
नेमबाजीत साईराज काटेला दोन पदके

उपराजधानीत तब्बल तीन वर्षांच्या दीर्घकाळानंतर आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट सामना खेळला जाणार आहे. त्यामुळे नागपूरकर क्रिकेटप्रेमींमध्ये कमालीची उत्सुकता आहे. मात्र, हवामान विभागाने जोरदार पावसाचा अंदाज वर्तविल्याने या सामन्यावर पावसाचे दाट सावट आहे. त्यामुळे क्रिकेट शौकिनांच्या उत्साहावर विरजण पडण्याची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, लवकरच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. त्याच्या प्रभावामुळे विदर्भात २१ सप्टेंबर किंवा त्यानंतर पुन्हा जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याच काळात विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या जामठा स्टेडियमवर यजमान भारत आणि विश्वविजेता ऑस्ट्रेलिया संघादरम्यान दुसरा आंतरराष्ट्रीय टी-२० सामना २३ सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे.

यासंदर्भात विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे सीईओ फारुख दस्तुर(Farooq Dastur) यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, सामन्याचा विमा काढण्यासाठी विविध विमा कंपन्यांशी सध्या वाटाघाटी सुरू असून, त्यांना कोटेशन मागितले आहे. दुर्दैवाने पावसामुळे सामना होऊ शकला नाही तर, त्या स्थितीत प्रेक्षकांना त्यांच्या तिकिटांचे पूर्ण पैसे परत केले जाणार आहे. जर वेळेपर्यंत विमा निघाला नाही आणि पावसामुळे सामना रद्द करण्यात आल्यास व्हीसीएला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. सध्याचे पावसाळी वातावरण आणि पुढील आठवड्यात पुन्हा पावसाची शक्यता लक्षात घेता विमा कंपन्याही सध्या द्विधा मनःस्थितीत आहेत. कारण सामना खेळला न गेल्यास विमा कंपनीला नुकसानापोटी व्हीसीएला मोठी रक्कम द्यावी लागणार आहे.

COMMENTS