अण्णा भाऊ साठे : इतिहासाला गवसणी!

Homeताज्या बातम्यासंपादकीय

अण्णा भाऊ साठे : इतिहासाला गवसणी!

नव्वदीच्या दशकात रशिया कोसळला आणि जागतिक पातळीवर भांडवलशाहीचे युग सुरू झाले. पण, आज त्याच रशियातील मास्को शहरातून डाव्या चळवळीची आठवण देणारी एक ऐतिहा

निसर्गाचा प्रकोपापेक्षा व्यसनमुक्तरहाणे आपल्या हातात : हभप बंडातात्या कर्‍हाडकर
अकोलेत 750 दिवे लावून त्रिपुरारी पौर्णिमा उत्साहात
माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंदे यांच्या विरोधात खामगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल 

नव्वदीच्या दशकात रशिया कोसळला आणि जागतिक पातळीवर भांडवलशाहीचे युग सुरू झाले. पण, आज त्याच रशियातील मास्को शहरातून डाव्या चळवळीची आठवण देणारी एक ऐतिहासिक घटना घडली असून, ही घटना भारताच्या दृष्टीने अतिशय अभिमानाची आहे. ही घटना म्हणजे दुसरे तिसरे काही नसून महाराष्ट्रातील शाहीर साहित्यिक आणि विचारवंत ज्यांनी शाळेच्या पायरीवर अवघ्या दुसरीपर्यंत आपले शिक्षण घेतले आणि त्या बळावर त्यांनी महाराष्ट्रामध्ये शाहिरी परंपरा लेखन आणि वैचारिक परंपरा ही सुरू केली त्याची दखल तत्कालीन सुविधा घेतली होती. त्यामुळेच कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांना ग्रे कार्ड देऊन रशियात निमंत्रित करण्यात आले होते आज त्यांच्या रशियातील आगमनाच्या त्या स्मृती जागवणाराच नव्हे तर त्या आगमनाचा इतिहास जगासमोर मांडणारी एक मान घटना घडली ती म्हणजे कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा मास्को शहरात उभारण्यात आला आणि त्याच्या अनावरण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. अण्णाभाऊ साठे महाराष्ट्राचेच नव्हे तर अख्या देशाला भूषण वाटावे असे व्यक्तिमत्व. ज्यांनी साहित्य लेखन शाहिरी, चिंतन याबरोबरच चळवळीचे अंग बनून कार्य केले भारतातून रशियापर्यंत गेलेले अण्णाभाऊ यांच्या मनात आपल्या शाहीर अंगाने नेमका कोणता विचार आला असेल असं जर आपण त्यांच्या माझी मैना गावाकडे राहिली या छक्कडला लक्षात घेऊन जर विचार केला तर रशियामध्ये गेल्यानंतर त्यांच्या मनात नेमक्या कोणत्या भावभावना आणि काव्यस्पर्ले असेल याचा अंदाज आता बांधता येत नसला तरीही त्या शाहिरी काव्याला नक्कीच त्या काळातही स्फुरण आले असेल, एवढे मात्र निश्चित. अण्णाभाऊ हे कामगार चळवळीत सक्रिय नेतृत्व राहिलेलं. परंतु, तेवढेच मुंबईच्या कामगार जीवनातील त्यांचा अनुभव आणि त्यावर त्यांनी रचलेली कवणे, छक्कड त्याबरोबरच संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी दिलेले योगदान आणि  शाहिरी स्फूरण देऊन  संयुक्त महाराष्ट्र चळवळीला प्रेरणा देणारे अण्णाभाऊ हे आज जेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर रशियात पुतळ्याच्या रूपात विराजमान झाले, तेव्हा प्रत्येक भारतीयाला आणि त्यातही प्रत्येक महाराष्ट्रीयन किंवा मराठी माणसाला अभिमान वाटावा, अशीच ही बाब आहे. अर्थात रशिया सारख्या देशामध्ये जिथे आज कम्युनिस्ट विचारधारा किंवा पक्ष नावालाही उरला नाही; अशा वेळी अण्णाभाऊंचा त्या ठिकाणी पुतळा उभारला जातो, ही बाब जागतिक पातळीवर अतिशय दखल घेण्याजोगी आहे. त्यांच्याकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन म्हणजे अतिशय विपन्न अवस्थेतून जगाच्या क्रांतिकारी प्रदेशाला गवसणी घालणारे अण्णाभाऊ आजही जगाच्या दृष्टीने अभ्यासाचा विषय आहेत. त्यावर महाराष्ट्रासारख्या राज्याकडून विशेषत: देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्वात निश्चितच भरीव कामगिरी झाली, असे स्पष्टपणे दिसते आहे.  अण्णाभाऊ साठे यांनी कामगार हा जेव्हा गाव सोडून कोणताही आधार नसताना पोटाच्या आगीला शांत करण्यासाठी रोजी-रोटीच्या शोधात जेव्हा मुंबईत येई, त्यावेळी आपला परिवार त्याला अगदी सुरुवातीलाच सोबतीला आणता येत नसे. त्याकाळी दळणवळणाची साधने जेमतेम. मागचा पुढचा विचार न करता जगण्याची धडपड म्हणून गाठलेली जिवाची मुंबई. त्यावेळी, व्यक्ती म्हणून त्या कामगाराच्या निर्माण होणारी भावपूर्ण वेदना अण्णाभाऊ यांनी ” माझी मैना गावाकडं राहीली….”, या छक्कडमधून अशा प्रकारे व्यक्त केली की, आजही ती छक्कड ऐकण्यासाठी मराठी माणूस आसूसलेला असतो. अण्णाभाऊ यांच्या रशिया भेटीच्या ऐतिहासिक स्मरणाला अभिवादन. 

COMMENTS