3 वर्षीय मुलीला घरगुती शिकवणी घेणाऱ्या शिक्षिकेने काविलत्याने दिले चटके

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

3 वर्षीय मुलीला घरगुती शिकवणी घेणाऱ्या शिक्षिकेने काविलत्याने दिले चटके

खारघर मधील एक धक्कादायक प्रकार समोर

नवी मुंबई :  खारघर मधील एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. एका 3 वर्षीय मुलीला शिक्षिकेने काविलत्याने चटका दिल्याचा प्रकार समोर आलाय. खारघर सेक्टर 15 मध

शिष्यवृत्ती परीक्षा ही एमपीएससी परीक्षेची पूर्वतयारी :- अभय आव्हाड 
गडहिंग्लज अर्बन बँके च्या “13 कोटी”अपहारातील दोघाना अटक! l पहा LokNews24
शहीद राजगुरू यांच्या जयंतीनिमित्त काँगे्रस सेवादलाकडून स्मारकाला भेट

नवी मुंबई :  खारघर मधील एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. एका 3 वर्षीय मुलीला शिक्षिकेने काविलत्याने चटका दिल्याचा प्रकार समोर आलाय. खारघर सेक्टर 15 मधील घरकुल सोसायटी मध्ये आरोपी साधना गायकवाड(Sadhana Gaikwad) या घरगुती शिकवणी घेतात. याच सोसायटी मध्ये राहणाऱ्या एका वावरे कुटुंबियाने आपल्या 3 वर्षाच्या मुलीला प्रीप्रायमरी शिकवणी साठी आरोपी साधना गायकवाड यांच्याकडे पाठवले होते. गृरुवारी आरोपी शिक्षिकेने या 3 वर्षीय मुलीला घरातील काविलता गरम करून अंगावर चटके दिल्याचा प्रकार केला. घरी आल्यावर मुलगी रडत असल्याने तसेच चटक्याचे डाग आल्याने पालकांनी या घटनेचा जाब विचारत पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी विचारल्यावर आरोपी शिक्षिकेने सदर प्रकार घडला नसल्याचे सांगितले मात्र शिकवणी साठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना विचारले असता सर्व सत्यता समोर आली. याप्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात आरोपी शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करण्यात येत आहे.

COMMENTS