दारुच्या दुकानात चोरांनी लढवली अजब शक्कल

Homeताज्या बातम्या

दारुच्या दुकानात चोरांनी लढवली अजब शक्कल

दारुड्यांनी छोट्या फटीमधून दारुच्या दुकानात प्रवेश केला

मुंबई प्रतिनिधी - सोशल मीडियावर आपल्या समोर असे काही व्हिडीओ येत असतात जे आपलं मनोरंजन करतात. तर काही असे व्हिडीओ देखील आपल्याला पाहायला मिळतात, जे ध

पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांचे मानवतेचे दर्शन; अपघातग्रस्तांना तत्काळ मदत
उसने पैसे मागितले म्हणून शिक्षिकेला जिवंत जाळलं.
Yogi Adityanath : “पुराव्याशिवाय कोणालाही अटक होणार नाही” (Video)

मुंबई प्रतिनिधी – सोशल मीडियावर आपल्या समोर असे काही व्हिडीओ येत असतात जे आपलं मनोरंजन करतात. तर काही असे व्हिडीओ देखील आपल्याला पाहायला मिळतात, जे धक्कादायक असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे,  दोन दारुड्यांनी आपल्या व्यसनामुळे दारुच्या दुकानात दरोडा घालण्याचा विचार केला. त्यासाठी त्यांनी बाजूच्या दुकानातून दारुच्या दुकानात जाण्यासाठी भिंतीमध्ये एक छोटी फट तयार केली. तसे पाहाता ही जागा फार छोटी होती. ज्यामधून एखादा व्यक्ती आत जाईल असं कोणी विचार देखील करणार नाही. परंतू दारूच्या ओढीने या दोन्ही दारुड्यांनी या छोट्या फटीमधून दारुच्या दुकानात प्रवेश केला.
या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की, पोलीस एका भिंतीसमोर उभे आहेत. तेथे भिंतीच्या दुसऱ्या बाजूला कोणीतरी असल्याचे दिसते. त्यानंतर ही व्यक्ती त्या छोट्या जागेतून बाहेर येते. या भिंतीमागे एक नाही तर दोन चोर गेलेले असतात, ज्यांना नंतर पोलिसांकडून पकडण्यात आले आहे..

COMMENTS