मनपा द्वारे नगर शहराचा पाणीपुरवठा  राम भरोसे सुरू असल्याची कबुली.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनपा द्वारे नगर शहराचा पाणीपुरवठा राम भरोसे सुरू असल्याची कबुली.

पाणीपुरवठ्यावरून अधिकारी व पदाधिकारी यांच्यात जोरदार शाब्दीक चकमक झाली.

अहमदनगर/प्रतिनिधी ः पाणी उपसा करणार्‍या पाच पंपांपैकी एक पंप नादुरुस्त आहे, पाणीपुरवठा विभागात केवळ दोन माणसे आहेत, पुरेसे व्हॉल्वमन नाहीत, नियंत

नगर शहरासह जिल्ह्यात लॉकडाऊनची गरज ; जागरूक नागरिक मंचाने केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी
नगर विकासासाठी महापालिका घेणार तीनशे कोटीचे कर्ज
संगमनेरमध्ये जागतिक ग्राहक दिन उत्साहात

अहमदनगर/प्रतिनिधी ः पाणी उपसा करणार्‍या पाच पंपांपैकी एक पंप नादुरुस्त आहे, पाणीपुरवठा विभागात केवळ दोन माणसे आहेत, पुरेसे व्हॉल्वमन नाहीत, नियंत्रणासाठी माणसे नाहीत, कंत्राटदाराची माणसे काम करीत नाहीत, असे असताना पदाधिकारी व नगरसेवक पाणी कमी येत असल्याचा जाब कसा विचारू शकतात, असा सवाल मनपा पाणीपुरवठा विभाग प्रमुख परिमल निकम(Parimal Nikam) यांनी करताच, नगरसेवक गणेश कवडे म्हणाले, म्हणजे नगर शहराचा पाणीपुरवठा राम भरोसे सुरू असल्याचे म्हणणे योग्य राहील ना?, त्यावर निकम म्हणाले, काही हरकत नाही, शहराचा पाणीपुरवठा राम भरोसेच सुरू आहे…मनपाच्या स्थायी समितीत पाणीपुरवठ्यावरून अधिकारी व पदाधिकारी यांच्यात जोरदार शाब्दीक चकमक झाली. नगर शहराची पाणी वितरण व्यवस्था ’रामभरोसे’ असल्याची कबुली महापालिका प्रशासनाने सभेत दिली. नगरसेवक गणेश कवडे यांनी विस्कळीत पाणी पुरवठ्यावरून जाब विचारताच जल अभियंता परिमल निकम यांनी अपुरे मनुष्यबळ व अपुर्‍या यंत्रणेची माहिती देत अशा परिस्थितीत तुम्ही जाब कसा विचारता असा प्रतिसवाल केला. यावर पदाधिकारी व सदस्यही निरुत्तर झाले.

नगरसेवक कवडे व प्रशांत गायकवाड यांनी प्रभागातील पाण्याच्या समस्येवरून सवाल उपस्थित केला. मुळा धरणात शंभर टक्के पाणीसाठा असूनही पाणी मिळत नाही, असा सवाल नागरिक करीत आहेत. नगरसेवकांना दररोज नागरिकांच्या या प्रश्‍नाला सामोरे जावे लागते. आधीच एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. 365 दिवसांपैकी फक्त शंभर-सव्वाशे दिवस आपण पाणी देतो, त्यातही पाणीपुरवठा खंडित होतो. शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत आहे, असे नगरसेवक कवडे यांनी सांगितल्यावर जल अभियंता निकम यांनी यासंदर्भात माहिती देताना एक ट्रान्सफार्मर बंद असल्याने पाचऐवजी चार मोटारींवरच पाणी उपसा सुरू आहे, तसेच विभागातील अभियंता सदाशिव रोहकले यांना स्वेच्छा निवृत्ती देण्यात आली व त्यांच्या जागेवर अद्यापही अभियंता नियुक्त झालेला नाही. पाणीपुरवठ्याचे नियोजन, वॉलमनचे नियोजन, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कर्मचारी उपलब्ध नाहीत. अपुरे मनुष्यबळ व अपुरी यंत्रणा असताना आपण जाब कसा विचारू शकता, असा प्रतीसवाल निकम यांनी केला. त्यावर सारेच निरुत्तर झाले व कवडे यांनी सभापती वाकळे यांना तात्काळ माणसे उपलब्ध होण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली. सभापती वाकळे यांनी मग, पाणीपुरवठा विभागाच्या प्रस्तावांवर तातडीने निर्णय घ्यावा व त्यांना कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, असे आदेश आस्थापना विभागाला दिले.

65 लाखाने खर्च केला कमी

सण व उत्सव काळात बंदोबस्तासाठी बॅरिकेडिंग करणे, मंडप, शामियाना उभारणे आदी विविध कामांसाठी महापालिकेने 95 लाखांचा खर्च प्रस्तावित करून मागविलेल्या निविदेवर स्थायी समितीने आक्षेप घेतला. सभापती वाकळे यांनी 95 ऐवजी 30 लाखांच्या खर्चाची तरतूद करीत निविदा मंजूर केली. दरम्यान, कशाच्या आधारावर खर्च चौपट करण्यात आला, यावर उत्तर देताना अधिकार्‍यांची भंबेरी उडाली. मागील वर्षी महापालिकेने 12 महिन्यांसाठी 24 लाख रुपये खर्चाची निविदा मंजूर केली होती. पण, महापालिकेने चालू वर्षासाठी तब्बल 95 लाख रुपयांचा खर्च प्रस्तावित केला. स्थायी समितीच्या सभेत नगरसेवक गणेश कवडे व पाऊलबुद्धे यांनी आक्षेप घेत चौपट दराने खर्च का प्रस्तावित करण्यात आला, असा जाब विचारला. निविदा स्थगित ठेवावी, अशी मागणी केली. शहर अभियंता सुरेश इथापे यांनी माहिती देण्याचा प्रयत्न केला. मागील वर्षी 24 लाख रुपये खर्च प्रस्तावित करण्यात आला होता. मात्र तेवढा खर्च झाला नाही. मागील काही देणेही बाकी आहे. त्यामुळे मनपाने 95 लाख रुपये खर्च प्रस्तावित केला असला, तरी ठेकेदाराने 15 टक्के कमी दराने निविदा भरली आहे. वर्षभरात जसा खर्च होईल, त्याप्रमाणे बिले मंजूर केली जातात, असे स्पष्टीकरण केले. मुख्य लेखाधिकारी शैलेश मोरे यांनीही दर मंजूर करावेत व खर्च 30 लाख रुपये प्रस्थापित करावा. जास्त खर्च करण्याची वेळ आल्यास स्थायी समितीकडून वाढीव मंजुरी घ्यावी, अशी सूचना केली. त्यानुसार सभापती वाकळे यांनी 95 लाखाचा खर्च रद्द करून 30 लाख रुपये खर्च प्रस्तावित करत वार्षिक निविदा मंजूर केली.

COMMENTS