निवडणुकीसाठी 5 लाख रुपये माहेरकडून आणण्यासाठी छळ.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निवडणुकीसाठी 5 लाख रुपये माहेरकडून आणण्यासाठी छळ.

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेची आत्महत्या

अकोला प्रतिनिधी- सासरच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेने आत्महत्या केली. अकोला जिल्ह्याच्या उरळ पोलीस स्टेशन हद्दीतील मांजरी येथे ही घटना घडली आहे. 

वडवणी येथील अल्पभूधारक शेतकर्‍याची आत्महत्या
भाजप नेत्याच्या मुलीची आत्महत्या
जप्त ट्रॅक्टर सोडण्यासाठी अडवणूक, देहर्‍याच्या युवकाने केली आत्महत्या

अकोला प्रतिनिधी– सासरच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेने आत्महत्या केली. अकोला जिल्ह्याच्या उरळ पोलीस स्टेशन हद्दीतील मांजरी येथे ही घटना घडली आहे. जयश्री नागे (वय 26 वर्षे) असं या विवाहितेचं नाव आहे. पंचायत समिती निवडणुकीसाठी 5 लाख रुपये माहेरकडून आणण्यासाठी सासरच्यांनी तिच्यामागे तगादा लावला होता. या त्रासाला कंटाळून अखेरीस जयश्रीने स्वत:चे आयुष्य संपवलं.आता या प्रकरणात सासरच्यांवर स्थानिक पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हे दाखल असून तिच्या पतीला अटक केली आहे. गुन्हा दाखल झालेल्या सासरच्या लोकांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते असलेले तिचे सासरे आणि अकोला पंचायत समितीचे माजी सभापती वसंतराव नागे, सासू आणि वंचितच्या विद्यमान पंचायत समिती सदस्य शोभा नागे यांचा समावेश आहे.

COMMENTS