Honda बाइकचं न्यू एडीशन लाँच

Homeताज्या बातम्याटेक्नोलॉजी

Honda बाइकचं न्यू एडीशन लाँच

नवीन मॉडेलमध्ये काय असेल खास?

भारतातली दुसरी सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी होंडाने या फेस्टिव्ह सीझनपूर्वी मोठा धमाका करत त्यांची बेस्ट सेलिंग बाइक होंडा शाईनचं सेलिब्रेशन एडीश

वीज यंत्रणेवरील स्थानिक कर आकारणीतून महावितरणला सूट
चांद्रयान-3 चे यशस्वी प्रक्षेपण
भूलतज्ज्ञ संघटनेची देशव्यापी मशाल यात्रा बुधवारी कराडमध्ये येणार

भारतातली दुसरी सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी होंडाने या फेस्टिव्ह सीझनपूर्वी मोठा धमाका करत त्यांची बेस्ट सेलिंग बाइक होंडा शाईनचं सेलिब्रेशन एडीशन भारतात लाँच केलं आहे. कंपनीने हे मॉडेल दोन कलर व्हेरिएंट्स्मध्ये सादर केलं आहे. यामध्ये मॅट स्टील ब्लॅक मेटॅलिक आणि मॅटे संग्रिया रेड मेटॅलिक या दोन रंगांचा पर्याय मिळेल. ग्राहक ही बाइक ड्रम आणि डिस्क अशा दोन व्हेरिएंट्समध्ये खरेदी करू शकतात. या नवीन बाइकची किंमत ७८,८७८ रुपये इतकी आहे. शाईनचं नवीन सेलिब्रेशन एडीशन आकर्षक गोल्डन थीममध्ये नवीन रंगांसह सादर करण्यात आलं आहे. नवीन स्ट्राईप्स, गोल्डन विंगमार्क आणि टँक टॉपवर सेलिब्रेशन एडीशन लोगोसारख्या व्हॅल्यू एडीशन्ससह नवीन बाइक अधिक प्रीमियम दिसते. Honda Shine च्या एडीशनमध्ये कोणताही मेकॅनिकल बदल करण्यात आलेला नाही. या बाइकमध्ये १२३.९४ सीसी क्षमतेचं सिंगल सिलेंडर ४-स्ट्रोक, एसआय इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन ७५०० आरपीएमवर ७.९ केडब्ल्यू मॅक्सिमम पॉवर जनरेट करू शकतं आणि ६००० आरपीएमवर ११ न्युटन मीटर टॉर्क जनरेट करू शकतं. यामध्ये ५ स्पीड इंजिन गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

COMMENTS