बस दरीत कोसळून 6 जवान शहीद

Homeताज्या बातम्यादेश

बस दरीत कोसळून 6 जवान शहीद

श्रीनगर/वृत्तसंस्था : जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये आयटीबीपी अर्थात इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस दलाच्या 37 जवानांना घेऊन जाणार्‍या एका बसला अपघात झाला आह

भरधाव कार ट्रकवर आदळून दोन जण ठार
एक्स्प्रेस वेवरील अपघातात सहा जणांचा मृत्यू
आठ वर्षीय तनिषला दुचाकीची धडक

श्रीनगर/वृत्तसंस्था : जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये आयटीबीपी अर्थात इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस दलाच्या 37 जवानांना घेऊन जाणार्‍या एका बसला अपघात झाला आहे. ही बस चंदनवारी भागातून पहलगामच्या दिशेने येत होती. बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या बसमध्ये एकूण 39 प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी 37 आयटीबीपीचे जवान होते. या दुर्घटनेत 6 जवान शहीद झाले.
चंदनवाडी जवळ ही बस दरीत कोसळली. काळजाचा थरकाप उडवणारी दृश्यही समोर आली आहे. एकूण सहा जवान या भीषण अपघातत शहीद झालेत. तर कित्येक जवान जखमी झालेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याचं काम सुरु आहे. या अपघातामध्ये बसचा अक्षरशः चुराडा झाला. त्यावरुन हा अपघात किती भीषण होता, याची निव्वळ कल्पनाही अंगावर काटा आणणारी आहे. अमरनाथ यात्रेतील ड्यूटीवरून सर्व जवान परतत होते. अमरनाथ यात्रेचा प्रारंभ बिंदू असलेल्या चंदनवाडी येथून जवान पहलगामला येत होते. यादरम्यान चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस नदीत कोसळली. स्थानिक अधिकार्‍यांनी सांगितले की, जखमी जवानांना रुग्णालयात नेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बचाव मोहीम सुरू करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघात झालेल्या बसच्या मागे आयटीबीपीची आणखी एक बस होती. त्यात कमांडो होते. समोरच्या बसला अपघात होताच दुसर्‍या बसमध्ये बसलेले कमांडो खाली उतरले आणि त्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. किरकोळ जखमी झालेल्या जवानांना उपचारासाठी पहलगाम येथे पाठवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तर ज्यांना गंभीर दुखापत झाली आहे, त्यांना एअरलिफ्ट करून श्रीनगरला पाठवण्यात आले आहे.

COMMENTS