संतोष बांगर यांनी शिवीगाळ करत उपहारगृह व्यवस्थापकाच्या लगावली कानशिलात.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संतोष बांगर यांनी शिवीगाळ करत उपहारगृह व्यवस्थापकाच्या लगावली कानशिलात.

कामगारांसाठी मिड डे मिल योजनेत निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात असल्याचा आरोप

हिंगोली प्रतिनिधी - उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) गटातून पलटी घेत शिंदे गटामध्ये सामील झालेले हिंगोलीचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी एका

इतकी कू्ररता येते कुठून ?
अयोध्यातील महतांनी दिले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्या येण्याचे आमंत्रण 
जामखेडमध्ये एसटीचा भोंगळ कारभार

हिंगोली प्रतिनिधी – उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) गटातून पलटी घेत शिंदे गटामध्ये सामील झालेले हिंगोलीचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी एकाला शिवीगाळ करत कानशिलात लगावल्याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. कामगारांसाठी असलेल्या मिड डे मिल योजनेत निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात असल्याचा आरोप करत शिवसेनेचे बंडखोर आमदार संतोष बांगर यांनी  एका उपहारगृहाची पाहणी केली. त्यावेळी तेथील परिस्थिती पाहून आमदार बांगर यांचा राग अनावर झाला. यावेळी त्यांनी शिवीगाळ करत मॅनेजरला एकदा नाही तीन वेळा कानशिलात भडकवल्या. सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

COMMENTS