गाईला वाचविण्याचा प्रयत्नात चौघांचा मृत्यू.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गाईला वाचविण्याचा प्रयत्नात चौघांचा मृत्यू.

चंद्रपूर-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

चंद्रपूर प्रतिनिधी-   चंद्रपूर(Chandrapur) जिल्ह्यातील सावली- गडचिरोली(Sawli- Gadchiroli) मार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झ

नाशिक – औरंगाबाद मार्गावर खाजगी बसचा मोठा अपघात
घराची पडवी अंगावर कोसळून माजी सरपंच महिलेचा दुर्दैवी मृत्यू .
समृद्धी महामार्गावरील अपघातात एकाचा मृत्यू

चंद्रपूर प्रतिनिधी-   चंद्रपूर(Chandrapur) जिल्ह्यातील सावली- गडचिरोली(Sawli- Gadchiroli) मार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. बोलेरो वाहन ट्रकवर आदळल्याने बोलेरोतील चौघांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होते आहे. गडचिरोली येथील प्रसिद्ध डीजे वादक पंकज बागडे(Pankaj Bagde) (वय 26) याचा मृतांमध्ये समावेश आहे. चंद्रपूरहून डीजे संदर्भातील साहित्य खरेदी करून गडचिरोलीला हे सगळे जण परतत होते. बोलेरोतील व्यक्ती, रात्री रस्त्यावर बसलेल्या गाईला वाचवण्याच्या प्रयत्नात अचानक स्टेअरिंग रॉड तुटला आणि अचानक बोलेरो बाजूच्या ट्रकवर आदळली. घटनास्थळी सावली व किसान नगर येथील नागरिकांनी पोचत पोलिसांच्या मदतीने जखमींना रूग्णालयात दाखल केलं.  या अपघातात पंकज  बागडे ( 26 ),अनुप ताडूलवार (35 ) ,महेश्ववरी ताडूलवार ( 24 ) ,मनोज तीर्थगिरीवार ( 29 )  यांचा मृत्यू झाला आहे. तर सुरेंद्र हरेंद्र मसराम ( 23 ) चिखली हा गंभीर जखमी आहे.

COMMENTS