पंढरपूर प्रतिनिधी- पंढरपूर(Pandharpur) मध्ये क्रिकेट खेळताना गुप्तांगाला चेंडू लागून तरुणाचा मृत्यू झाला आहे. पंढरपूरच्या तावशी (Tawshi) गावातील घडल
पंढरपूर प्रतिनिधी- पंढरपूर(Pandharpur) मध्ये क्रिकेट खेळताना गुप्तांगाला चेंडू लागून तरुणाचा मृत्यू झाला आहे. पंढरपूरच्या तावशी (Tawshi) गावातील घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली. क्रिकेट खेळत असताना एका तरुणाच्या गुप्तांगाला चेडूचा मार मारला. त्यानंतर हा तरुण जागच्या जागी कोसळला. विक्रम गणेश क्षीरसागर(Vikram Ganesh Kshirsagar) असं मृत तरुणाचं नाव असून त्याचं वय 35 वर्ष होतं. विक्रमच्या मृत्यूप्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात(Pandharpur Taluka Police Station) नोंद करण्यात आली असून त्याच्यासोबत क्रिकेट खेळत असलेल्या मित्रांना मोठा धक्काच बसला आहे.

COMMENTS