जिल्हा परिषद आरक्षणाचा भल्या-भल्यांना बसला फटका

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हा परिषद आरक्षणाचा भल्या-भल्यांना बसला फटका

माजी अध्यक्षांना आता कुणबीचा आधार

अहमदनगर/प्रतिनिधी : जिल्हा परिषदेच्या 85 जागांसाठी गुरुवारी काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीचा जिल्ह्याच्या राजकारणातील दुसर्‍या फळीतील भल्या-भल्या राजक

पेट्रोल व डिझेल न देण्याच्या सक्त सूचना ; फक्त अत्यावश्यक सेवेसाठीच मिळणार | ‘आपलं नगर’ | LokNews24
कोमल वाकळे हीचे बाबुजी आव्हाड महाविद्यालयात जल्लोषात स्वागत
अकोल्यात 132 दिव्यांगांनी केले घरातून मतदान

अहमदनगर/प्रतिनिधी : जिल्हा परिषदेच्या 85 जागांसाठी गुरुवारी काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीचा जिल्ह्याच्या राजकारणातील दुसर्‍या फळीतील भल्या-भल्या राजकारण्यांना फटका बसला. नगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे बंधू सचिन जगताप यांचा श्रीगोंदे तालुक्यातील बेलवंडी गट राखीव झाला आहे. त्यामुळे त्यांना आता दुसरा व खुला गट शोधावा लागणार आहे तर मावळत्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राजश्री घुले यांचा दहिगावने गट ओबीसी आरक्षित झाल्याने त्यांना आता कुणबी सर्टिफिकेटचा आधार घेऊन लढावे लागणार आहे. मात्र, माजी अध्यक्ष शालिनीताई विखे यांना लोणी खुर्द गटात महिला राखीव असल्याने काही अडचण नसल्याचेही सांगण्यात येते
ओबीसींच्या जागांसह राखीव व महिला आरक्षणामुळे विद्यमान काही बड्या सदस्यांचा हिरमोड झाला आहे. एक तर त्यांचा गट आरक्षित झाला आहे, तर काही ठिकाणी महिलांचे आरक्षण पडले आहे. यामुळे त्यांच्या गोटात कही खुशी-कही गम असे वातावरण आहे. अकोले तालुक्यात माजी सभापती कैलास वाकचौरे यांचा आधीचा धामणगाव आणि आताचा धुमाळवाडी गट आरक्षित झाला आहे. विद्यमान भाजप सदस्य जालिंदर वाकचौरे यांचा गट महिलेसाठी झाला आहे. राजूर गटातील सुनीता भांगरे यांचा गट ओबीसींसाठी आरक्षित झाल्याने त्यांची अडचण झाली आहे. संगमनेर तालुक्यात अजय फटांगरे यांचा बोटा गट खुला झाला आहे. कोपरगाव तालुक्यात विद्यमान सदस्य राजेश परजणे यांचा गट खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाला आहे. बेलापूरमधून विद्यमान सदस्य शरद नवले यांचा गट ओबीसी राखीव झाल्याने त्यांना पुन्हा नशीब आजमावता येणार आहे. नेवासा तालुक्यात सभापती सुनील गडाख यांच्यापुढे अडचण आली असून त्यांच्यासाठी एकही गट शिल्लक नाही. तालुक्यातील आठपैकी सात गट महिलांसाठी राखीव असून राहिलेला एक गट अनुसूचित जमातीसाठी आहे. यामुळे विठ्ठलराव लंघे यांचीही अडचण झाली आहे. शेवगावात घुले परिवाराला दहिगाव-ने गट सोयीचा आहे, पण यंदा तो ओबीसीसाठी राखीव आहे. त्यामुळे माजी अध्यक्षा राजश्रीताई घुले यांना कुणबी प्रमाणपत्राचा आधार घेऊन लढावे लागणार आहे. नगर तालुक्यात माधवराव लामखडे यांचा गट अनुसूचित जातीसाठी तर सदस्य शरद झोडगे यांचा गट ओबीसी महिलेसाठी तसेच उपाध्यक्ष प्रताप शेळके यांचा गट सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाला आहे. वाळकी आणि दरेवाडी हे सर्वसाधारण राहिल्याने माजी सदस्य बाळासाहेब हराळ यांना राजकीय वनवास संपवण्याची संधी आहे. तर शिवसेना सदस्य संदेश कार्ले यांना दरेवाडीतून पुन्हा झेडपीचा रस्ता खुला राहणार आहे. पारनेर तालुक्यात सभापती काशिनाथ दाते यांचा गट खुला राहिला आहे. कर्जत तालुक्यात नव्याने तयार झालेला आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांचा कोरेगाव गट अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाला आहे. तर माजी झेडपी सदस्य राजेंद्र गुंड यांचा कुळधरण गट सर्वसाधारण राहिल्याने गुंड यांना संधी राहणार आहे. श्रीगोंद्यातील लिंपणगाव गट सर्वसाधारण असल्याने याठिकाणी सदस्य अनुराधाताई नागवडे यांना संधी राहणार आहे. दरम्यान, श्रीगोंदा तालुक्यात पिंपळगाव पिसा गट सर्वसाधारणसाठी असल्याने त्याठिकाणी माजी आ. राहुल जगताप यांच्या परिवारातून झेडपीसाठी उमेदवारी होऊ शकते.

COMMENTS