शिक्षक भरती घोटाळा आणि ऑपरेशन लोटस

Homeताज्या बातम्यासंपादकीय

शिक्षक भरती घोटाळा आणि ऑपरेशन लोटस

गेल्या अनेक वर्षांपासून पश्‍चिम बंगालमध्ये ईडीची छापेमारी जोरात सुरु आहे. मात्र छापेमारीमुळे पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नेहमीच

गळ्यात टांगा भोंगा
महसूल तूट चिंताजनक
चहाबाज नगरकर

गेल्या अनेक वर्षांपासून पश्‍चिम बंगालमध्ये ईडीची छापेमारी जोरात सुरु आहे. मात्र छापेमारीमुळे पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नेहमीच आकंडतांडव करत, केंद्राचा हा राज्याच्या अधिकारावर घाला आहे, प्रादेशिक पक्षांची स्वायतत्तता संपवण्याचा हा घाट असल्याचा अनेकवेळेस आकंडतांडव ममता बॅनर्जी यांनी अनेक वेळेस केला. वास्तविक पाहता ममता यांनी केलेला आकंडतांडव आणि ईडी, सीबीआयचे नेहमी पडणारे छापे यामुळे ममता यांच्याविषयी जनतेच्या मनात सहानुभूती निर्माण झाली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून पश्‍चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळा चांगलांच गाजतांना दिसून येत आहे. ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळातील पार्थ चटर्जी यांना ईडीने अटक केल्यानंतर देखील सहानुभूतीची लाट निर्माण केली होती. मात्र त्यांची सहकारी असलेली अर्पिता हिच्या घरी जेव्हा ईडीला घबाड सापडले, तेव्हा संपूर्ण भारताला या घटनेची तीव्रता दिसून आली. 20 कोटींपेक्षा अधिक रक्कम रोख, त्यानंतर पुन्हा दोन दिवसांनंतर अर्पिताच्या दुसर्‍या घरी देखील 20 कोटींपेक्षा अधिक रोख रक्कम आणि तीन किलो सोने सापडून आल्यामुळे अनेकांचे डोळे यामुळे विस्फारले. वास्तविक पाहता ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळातील एक सहकारी कोटयावधी रुपयांचा भ्रष्टाचार करतो, आणि ममता बॅनर्जी यांना ते ठाऊन होत नाही, असे नाही. मग ममता बॅनर्जी या भ्रष्टाचारावर का पांघरून घालत होत्या, हा मोठा प्रश्‍न आहे.
कर नाही, त्याला डर कशाला, असे म्हणतात. मात्र ज्यांचे हात भ्रष्टाचारा खाली बरबटलेले आहे, त्यांना तपास यंत्रणांची भीती ही वाटणारच. मात्र ज्यांनी निरपेक्षपणे आयुष्यभर केवळ चारित्र्य जपले, अशा व्यक्तींवर तपास यंत्रणा छापे टाकू शकत नाही. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँगे्रस, शिवसेना नेत्यांच्या घरावर छापे टाकण्यात येत होते. त्यामुळे राज्यात सत्तांतर करण्यासाठी एवढे सगळे नाटय सुरु असल्याची टीका त्यांच्यावर होत होती. मात्र जर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते यात दोषी नसतील, तर त्यांच्यावर हात टाकण्याचा हिंमत ईडीमध्ये झाली नसती. मात्र यांनी कुठेतरी झाकून व्यवहार केलेले असतात. काळा पैसा, पांढरा केला जातो. त्यासाठी बेनामी कंपन्या उभारल्या जातात. मात्र जेव्हा यासंबंधीचे कागदपत्रे कुणाच्या हाती येतात, तेव्हा या भ्रष्टाचाराला पाय फुटतात आणि त्यातून मग, हा भ्रष्टाचार बाहेर येतो. बरे ईडीची कारवाई चुकीची असेल, मात्र या देशातील न्यायव्यवस्था सक्षम आहे. त्यामुळे कारवाई करतांना ईडीने काय कागदपत्रे कोर्टात दाखल केली, यासंदर्भातील सगळा उहापोह तिथे होतो. पश्‍चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळातील सगळेच चेहरे धुतल्या तांदळासारखे नक्कीच नसणार यात शंका नाही. तिथे भ्रष्टाचाराचे पाळेमुळे चांगलीच पसरलेली दिसून येत आहे. शिवाय गेल्या अनेक वर्षांपासून ममता बॅनर्जी यांची पश्‍चिम बंगालवर एकहाती सत्ता आहे. अशावेळी एका मंत्र्याकडे एवढी मोठी घबाड सापडल्यामुळे हा भ्रष्टाचार साधा-सुधा नसल्याचे दिसून येत आहे. यात आणखी कुणाचा हात आहे, या सर्व बाबींचा उहापोह चौकशीतून समोर येईलच. याशिवाय पश्‍चिम बंगालमध्ये भाजप ऑपरेशन लोटस राबविण्यास इच्छूक असल्याचे दिसून येत आहे. भाजपचे नेते मिथुन चक्रवती यांनी तृणमूल काँगे्रसचे तब्बल 38 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे पश्‍चिम बंगालमध्ये सत्तांतर झाल्यास ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळातील अनेक नेते तुरुंगात जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे शिक्षक भरती घोटाळा पश्‍चिम बंगालमध्ये सत्तांतर होण्यास कारणीभूत न ठरो.

COMMENTS