नवी दिल्ली : भारताने देशातील रामसर स्थळांच्या संख्येत आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या पाच (5) नवीन पाणथळ स्थानाचा समावेश केला आहे.यात तमिळनाडूमधील तीन पाण
नवी दिल्ली : भारताने देशातील रामसर स्थळांच्या संख्येत आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या पाच (5) नवीन पाणथळ स्थानाचा समावेश केला आहे.
यात तमिळनाडूमधील तीन पाणथळ प्रदेश (कारीकिली पक्षी अभयारण्य, पल्लिकरणाई पाणथळ राखीव अभयारण्य आणि पिचावरम कांदळवन), मिझोराममधील एक स्थान (पाला पाणथळ प्रदेश) आणि मध्यमधील एक पाणथळ स्थान (सख्य सागर) यांचा समावेश आहे. देशात यामुळे एकूण 54 रामसर स्थळे झाली आहेत. रामसर स्थळांची संख्या 49 वरून 54 इतकी वाढवण्यात आली आहे.
याबाबत ट्वीटरद्वारे केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनावर भर दिल्याने भारत आपल्या पाणथळ प्रदेशांशी लक्षणीय सुधारणा झाली आहे. कळविण्यास आनंद होत आहे की, आणखी 5 भारतीय पाणथळ भूभागांना आंतरराष्ट्रीय महत्त्वाची पाणथळ जागा म्हणून रामसर मान्यता मिळाली आहे. भारतातील एकूण रामसर साइट्स आता ४९ वरून ५४ वर पोहोचल्या आहेत, सर्वांचे अभिनंदन!
COMMENTS