सिगरेट पिण्यास मनाई केल्याने हॉटेलमध्ये चाकू हल्ला.

Homeताज्या बातम्याव्हिडीओ

सिगरेट पिण्यास मनाई केल्याने हॉटेलमध्ये चाकू हल्ला.

घटना सीसीटीव्ही मध्ये कैद.

अंबरनाथ  प्रतिनिधी- हॉटेलमध्ये बसून सिगरेट प्यायला मनाई केल्याने तरुणाचा हॉटेल चालकाशी वाद होऊन हाणामारी झाल्याची घटना अंबरनाथ(Ambernath) मध्ये घडली

ज्याची जशी लायकी तशी भाषा मी वापरली त्या बद्दल मी माफी मागणार नाही – खा. संजय राऊत
वाढता जातीय तणाव चिंताजनक  
रेल्वेकडून महाराष्ट्राला 13 हजार 539 कोटींची निधी

अंबरनाथ  प्रतिनिधी- हॉटेलमध्ये बसून सिगरेट प्यायला मनाई केल्याने तरुणाचा हॉटेल चालकाशी वाद होऊन हाणामारी झाल्याची घटना अंबरनाथ(Ambernath) मध्ये घडली आहे. यावेळी तरुणाने हॉटेल चालकासह वेटरवर चाकूने हल्ला केला. तर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनीही या तरुणाला बेदम मारहाण केली. जयेश सोनावणे(Jayesh Sonawane) असे या तरुणाचे नाव आहे. तर ओमकार काशीद(Omkar Kashid) असे वेटरचे आणि अनिल मराडे(Anil Marade) असे हॉटेल मालकाचे नाव आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात(Shivajinagar Police Station) गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

COMMENTS