Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कराडमध्ये एटीएम चोरट्यांसमवेत पोलिसांची झटापट; एका चोरट्यास पकडण्यात यश; एटीएम फोडण्यासाठी जिलेटीनच्या कांड्या

कराड / प्रतिनिधी : कराड-विटा मार्गावर असलेल्या गजानन हौसिंग सोसायटीतील बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडणारे चोरटे आणि पोलिसामध्ये सिनेस्टाईल झटापट झाली.

सुरत-हैदराबाद महामार्गाची अधिसूचना पुन्हा आली
पत्नीवर हल्ला करणाऱ्या पतीचा स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न | DAINIK LOKMNTHAN
पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राची माफी मागावी : नाना पटोले

कराड / प्रतिनिधी : कराड-विटा मार्गावर असलेल्या गजानन हौसिंग सोसायटीतील बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडणारे चोरटे आणि पोलिसामध्ये सिनेस्टाईल झटापट झाली. या घटनेमध्ये चोरट्यांनी पोलिसांच्या डोळ्यावर स्प्रे मारून पलायन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही पोलिसांनी एकाला घटनास्थळारून ताब्यात घेतले आहे. उर्वरित पसार झालेल्या चोरट्यांना पकडण्यासाठी कराड शहर पोलिसांनी नाकाबंदी केली. पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. ही घटना आज सोमवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
कराड शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गजाजन हौसिंग सोसायटीत काही लोक एटीएम फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. असा संदेश वायरलेस ऑपरेटर यांना प्राप्त झाला. यावेळी वायरलेस कर्तव्यावरील महिला अमंलदार यांनी पहाटे 2.48 वाजण्याच्या सुमारास दामिनी मोबाईल व बीट मार्शल- 5 यांना गजानन हौसिंग सोसायटी जवळील बँक ऑफ इंडियाचे एटीएम काही लोक फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले. त्यानंतर तात्काळ दामिनी मोबाईल कर्तव्यावरील पोलीस हवालदार जयसिंग राजगे, पो. ना. पाटील तसेच बीट मार्शल-5 कर्तव्यावरील हवालदार सचिन सूर्यवंशी आणि होमगार्ड निकम यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेंव्हा तेथे चारजण एटीएम फोडण्याचा प्रयत्न करत होते.
घटनास्थळी पोलिसांना पाहताच चौघांनी अंमलदारांच्या डोळ्यावर स्प्रे मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलीस कर्मचार्‍यांच्या पथकाच्या डोळ्यावरती स्प्रे मारलेला असतानाही, त्यांनी त्यामधील एका आरोपीस पकडून ठेवले. त्या परिस्थीतीत पीसीआर मोबाईलला संदेश देऊन अतिरिक्त मदत मागितली. त्यानंतर पीसीआर मोबाईल मसपोनि सौ. शादिवान यांच्यासह पोलिस कर्मचारी या ठिकाणी गेले. डोळ्यावर स्प्रे मारलेला असताना सचिन अशोकराव वाघमोडे (वय 38, रा. आदर्शनगर, काळेवाडी, पुणे) यास पकडून ठेवले होते. तसेच त्यांची गुन्ह्यात वापरलेली एक होंडा ट्विस्टर मोटरसायकल (एमएच 42 डब्ल्यू 5441) कळ्या रंगाची ताब्यात घेतली आहे. या घटनेची माहिती मिळताच संशयितांना पकडण्यासाठी विभागात नाकाबंदी लावली आहे.
या कारवाईत हवालदार जयसिंग राजगे, सचिन सूर्यवंशी व होमगार्ड निकम यांना त्यांच्या डोळ्यावर स्प्रे मारल्यामुळे त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी कृष्णा हॉस्पिटल, कराड येथे दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावरती उपचार चालू आहेत. या घटनेचा अधिक तपास एपीआय गोडसे करत आहेत.

एटीएम फोडण्यासाठी जिलेटीनच्या कांड्यांचा प्रकार
कराड : चोरट्यांनी एटीएम फोडण्यासाठी वापरलेले जिलेटीन कांड्या अखेर 9 तासानंतर ब्लास्ट करण्यात पोलिसांना यश आले आहे. तब्बल सात लाख रुपये कॅश असलेल्या एटीएम उडवण्यात आले.
आज सोमवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास चार चोरट्यांनी बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. चोरीची घटना मुंबईमधील मुख्य शाखेत समजल्याने तेथून कराड शहर पोलीस ठाण्यात याबाबतची माहिती देण्यात आली. त्यानंतर तात्काळ कराड शहर पोलीस ठाण्यातील चार कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा पोलिसांना पाहता चोरट्यांनी हातातील स्प्रे पोलीस कर्मचार्‍यांच्या डोळ्यात मारले. तरीही त्यापैकी एका चोरट्यास पोलिसांनी पकडून ठेवले व त्याबाबतची माहिती दामिनी पथकाला दिली. या झटापटीत तीन चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले.
कराड येथील गजानन हाऊसिंग सोसायटीत चोरट्यांनी एटीएम फोडण्यासाठी वापरलेले जिलेटीन कांड्या अखेर 9 तासानंतर ब्लास्ट करण्यात यश आले आहे. तब्बल सात लाख रुपये कॅश असलेल्या एटीएम उडवण्यात आले.
बँक ऑफ इंडियाच्या एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला तेथे घटनास्थळी सातारा जिल्हा पोलीस प्रमुख अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोराडे, त्यासोबत कराडचे पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्यासह बॉम्ब सदृश्य पथक दाखल झाले होते. डबल नऊ तासानंतर सात लाख रुपये असलेले एटीएम बॉम्बसूदृश्य पथकाने उडवून दिले. यावेळी कराड -विटा मार्गावरती चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच जिलेटीन कांड्या उडवताना मोठा स्फोट झाला.

COMMENTS