राज्यात अतिवृष्टीचे 84 बळी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात अतिवृष्टीचे 84 बळी

मुंबई/पुणे : राज्यात पावसाचा जोर चांगलाच वाढला असून, विदर्भात पावसाने कहर केला आहे. नदी, नाले तुुुुडूंब भरून वाहू लागल्याने नद्यांना पूर आला असून, धर

मोहिनीनगरला घरफोडीत 16 हजाराचा ऐवज चोरीस
अवैध कत्तलखान्यांविरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक
मुळातून शेतीसाठी आवर्तन सोडा अन्यथा शेतकर्‍यांसह घेणार धरणात जलसमाधी

मुंबई/पुणे : राज्यात पावसाचा जोर चांगलाच वाढला असून, विदर्भात पावसाने कहर केला आहे. नदी, नाले तुुुुडूंब भरून वाहू लागल्याने नद्यांना पूर आला असून, धरणात देखील पाणीसाठा वाढला आहे. गेल्या 12 दिवसांत अतिवृष्टीमुळे राज्यात 84 नागरिकांचा तर 180 जनावरांचा मृत्यू झाला आहे. नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात स्कार्पिओ गाडीतील 6 जण गाडीसह वाहून गेले असून, त्यातील तिघांचे मृतदेह सापडले असून, इतरांचा शोध घेतला जात आहे. तर वर्धा मधील सेलू तालुक्यातील सालई शिवारात रात्री पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या संतोष उत्तम आडे या युवकाचा बुधवारी मृतदेह आढळून आला. यामुळे जिल्ह्यात पुरामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची संख्या आता सातवर पोहचली आहे. गडचिरोली, नागपूर, पश्‍चिम महाराष्ट्रासह कोकणात विविध दूर्घटनेत आतापर्यंत 25 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला असून, राज्यावर पुढील 48 तास अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. राज्यभर पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. सतत पडणार्‍या पावसामुळे राज्यातील अनेक नद्यांच्या आणि धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. दरम्यान, पालघर, पुणे शहर, गडचिरोली या ठिकाणी पुढचे दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अतिवृष्टीच्या पार्श्‍वभूमीवर राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये ‘एनडीआरएफ’च्या 13 आणि ‘एसडीआरएफ’ची दोन पथके तैनात आहेत. तसेच गेल्या 12 दिवसांत अतिवृष्टीमुळे राज्यात 84 नागरिकांचा तर 180 जनावरांचा मृत्यू झाला आहे.

पुण्यातील शाळांना आज सुटी
पुणे शहर आणि परिसरात या चार पाच दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे व हवामान विभागाने गुरुवारी (ता. 14) अतिवृष्टीचा इशारा दिल्याने आज (गुरूवारी) पुणे शहरातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. याशिवाय पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्राथमिक व माध्यमिक शाळेला तसेच खाजगी शाळेला सुट्टी जाहीर करण्याचे आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत.

कल्याण- अहमदनगर महामार्ग पाण्याखाली
ठाणे आणि अहमदनगर हे दोन जिल्हे जोडणारा कल्याण अहमदनगर महामार्ग ठप्प झाला आहे. या महामार्गावरील किशोर गावाजवळ मुरबाडी नदीचे पाणी साचल्याने येथील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर दुसरीकडे मुरबाड तालुक्यात याच महामार्गावर मोरोशी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या डोंगरावरील माती आणि झाडे झुडपे रस्त्यावर आल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे.

आपत्कालीन परिस्थितीवर पूर्ण लक्ष : मुख्यमंत्री शिंदे
राज्यात पावसामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीवर पूर्ण लक्ष असून, सर्व जिल्हाधिकार्‍यांशी संपर्क आणि समन्वय ठेवण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याशी चर्चा झाली असून, त्यांना राज्यातील परिस्थितीबाबत सातत्यपूर्ण समन्वय ठेवण्याचे निर्देश दिल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

COMMENTS