महिलेच्या पोटात आढळला तब्बल दीड किलोचा गोळा.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महिलेच्या पोटात आढळला तब्बल दीड किलोचा गोळा.

महिलेच्या पोटातील तब्बल दीड किलोचा गोळा यशवीरित्या काढला.

औरंगाबाद प्रतिनिधी - औरंगाबाद(Aurangabad) जिल्हा सामान्य रुग्णालयात(District General Hospital) महिलेच्या गर्भाशयातून दीड किलो वजनाचा गोळा काढण्याची

LokNews24 l बनावट दारू तयार करणाऱ्या कारखान्यांवर धाड
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला खिंडार
छत्रपती शिवाजी‎ महाराजांच्या स्मारका समोरच केली आत्महत्या

औरंगाबाद प्रतिनिधी – औरंगाबाद(Aurangabad) जिल्हा सामान्य रुग्णालयात(District General Hospital) महिलेच्या गर्भाशयातून दीड किलो वजनाचा गोळा काढण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. खासगी रुग्णालयातील शस्त्रक्रियेसाठी किमान एक लाख रुपये खर्च येणार होता, मात्र, जिल्हा रुग्णालयात ही शस्त्रक्रिया केवळ 260 रुपयांत करण्यात आली. वाळूज(Waluj) येथील एका ४२ वर्षीय महिलेच्या गर्भाशयात गोळा असल्याचे निदान झाले. यामुळे महिलेला खूप त्रास होत असल्याने तिला  जिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून महिलेच्या पोटातील दीड किलो वजनाचा गोळा यशवीरित्या बाहेर काढला.

COMMENTS