कोपरगावात प्रशासनाने ठोकले प्रसिध्द  हॉस्पिटला  टाळे

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

कोपरगावात प्रशासनाने ठोकले प्रसिध्द हॉस्पिटला टाळे

गेल्या काही दिवसापासून कोपरगाव तालुक्यासह शहरात कोरोनाचा फैलाव जास्तच वेगाने वाढत चालला असून प्रशासन या वाढत्या कोरोचा विळखा सोडवण्यासाठी अहोरात्र महेनत करतांना दिसत आहे.

बालरंगभूमी परिषद’ अहमदनगर शाखेचे कार्य उल्लेखनीय
तुमचे आजचे राशीचक्र सोमवार, २१ जून २०२१ l पहा LokNews24
मनपातील महाविकास आघाडीला बसणार झटका ; काँग्रेस आणणार मंगळवारी आसूड मोर्चा

कोपरगाव शहर प्रतिनिधी-: गेल्या काही दिवसापासून  कोपरगाव तालुक्यासह  शहरात  कोरोनाचा फैलाव जास्तच वेगाने वाढत चालला असून प्रशासन या वाढत्या कोरोचा विळखा सोडवण्यासाठी अहोरात्र महेनत करतांना दिसत आहे. नागरिकांच्या निष्काळजी पणामुळे तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस शतक पार करत चालली असतांना कोपरगाव शहरातील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्या पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नामाकिंत हॉस्पिटलचे डॉक्टर हे स्वतः कोरोना बाधित असतांना  त्यांनी आपले रुग्णालय बंद न-ठेवता सर्रास पणे रुग्णांची तपासणी करत पैसे कमविण्याचा बाजार जोरदार सुरू असल्याची माहिती प्रशासनाला मिळताच  तत्काळ कोपरगाव चे तहसिलदार व वैद्यकीय आधिक्षक यांनी  हॉस्पिटला भेट देत सदर  हॉस्पिटल तत्काळ  सील करत कारवाई केली.


परंतु सदरच्या डॉक्टरांवर कोणत्याही प्रकारे  कारवाई होऊ नये यासाठी  शहरातील अनेक राजकिय नेते मंडळी व सामाजिक कार्यकर्ते हे प्रयत्न करत असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.  या कोरोना कालावधीत प्रशासनाने सर्वानाच नियम एकसारखेच दिलेले असतांना देखील उच्चभ्रू सोसायटीतील डॉक्टरानी  सर्व नियम धाब्यावर बसविले असतांना सामान्य नागरिकांनी थोडे जरी नियम मोडले तरी त्यांचा कडून प्रशासनाच्या वतीने दंड वसुली जोरात सुरू असते परंतु या मोठ्या लोकांवर कारवाई होणार का? हा प्रश्न  सामान्य जनतेला पडला आहे .

COMMENTS