आमदार संतोष बांगर यांची हिंगोली जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आमदार संतोष बांगर यांची हिंगोली जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी

हिंगोली/मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोरी अथवा शिंदे गटात सहभागी होणाऱ्या नेत्यांवर कारवाईचा धडाका कायम ठेवला आहे. आता आमदार संतोष

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांवर चालणार खटला
आमिर खानच्या लेकीचं मराठमोळं केळवण
रणबीर कपूर आई नीतू कपूरसोबत ‘जी हुजूर’ वर नाचताना दिसला.

हिंगोली/मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोरी अथवा शिंदे गटात सहभागी होणाऱ्या नेत्यांवर कारवाईचा धडाका कायम ठेवला आहे. आता आमदार संतोष बांगर यांची हिंगोली जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी केली आहे. पक्षविरोधी कृती केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. संतोष बांगर हे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभेचे आमदार तथा ते २००९ पासून हिंगोलीचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष देखील होते. विधानसभा अध्यक्ष निवडीपर्यंत शिवसेनेत असणारे बांगर अचानक दुसऱ्या दिवशी म्हणजे विधानसभेत बहुतमत सिद्धतेच्या दिवशी बंडखोरी करून शिंदे गटात सहभागी झाले. त्यानंतर हिंगोली जिल्ह्यात शिवसैनिकांनी त्यांच्याविरोधात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे पक्ष नेतृत्वाने जिल्हाध्यक्ष पदावरून हटवत त्यांच्यावर कारवाई केली आहे.

COMMENTS