भारतात आज राष्ट्रीय दुखवटा : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची हत्या

Homeताज्या बातम्याव्हिडीओ

भारतात आज राष्ट्रीय दुखवटा : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची हत्या

नारा/वृत्तसंस्था : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर हल्लेखोराने केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तत्काल रुग्णालयात दाखल क

मध्य प्रदेशमध्ये बस आणि ट्रकचा भीषण अपघात, 14 जणांचा मृत्यू
गावठी कट्टा व 6 जिवंत काडतुसांसह सराईत गुन्हेगार जेरबंद  
मुंबईत चार जंबो कोविड सेंटर सुरू करणार

नारा/वृत्तसंस्था : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर हल्लेखोराने केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तत्काल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र यात त्यांचा मृत्यू झाला. प्राथमिक वृत्तानुसार शिंजो आबे यांच्या छातीत गोळ्या लागल्या आहेत. जखमी अवस्थेत शिंजो आबे यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. सुरक्षा यंत्रणेने मारेकर्‍याला अटक केली आहे आणि त्याने हत्येची कबुली दिली आहे.
पश्‍चिम जपानमधील नारा शहरात भाषणादरम्यान त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला आणि ते खाली कोसळले. ते संसदेच्या वरिष्ठ सभागृहाच्या निवडणुकीपूर्वी एका सभेला संबोधित करत होते. ही घटना शुक्रवारी सकाळी 11.30 वाजता (भारतीय वेळेनुसार 8.29 वाजता) घडली. आबे हे शहरातील एका रस्त्यावर भाषण करत असताना त्यांच्यावर हल्ला झाला आहे. त्यावेळी बंदुकीच्या गोळीसारखा आवाज ऐकू आला. गोळी लागल्याने आबे यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले जात आहे.
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आबे यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र डॉक्टारांनी अनेक प्रयत्न करुनही त्यांची मृत्यूशी सुरु असणारी झुंज पाच तासांनी संपली. भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजून 33 मिनिटांनी म्हणजेच हल्ल्यानंतर दोन तासांनी आबे यांचा मृत्यू झाल्याची माहिती नारा मेडिकल युनिव्हर्सिटी हॉस्पीटलच्या डॉक्टरांनी दिलीय. आबे यांच्या एलडीपी (लिब्रल डेमोक्रॅटीक पार्टी) पक्षाच्या अधिकार्‍यांनी कासीहारा शहरातील रुग्णालयामध्ये आबे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. ते 67 वर्षांचे होते. आबे यांच्या मानेजवळ गोळी लागली होती. त्यांच्या शरीरावर गोळीमुळे झालेल्या दोन जखमा होत्या. अती रक्तस्त्राव झाल्याने आबे यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. पोलिसांनी सांगितले की, एका संशयिताला अटक केली असून, त्याच्याकडून एक बंदूक जप्त करण्यात आली आहे. संशयिताची चौकशी करण्यात येत आहे. या संशयिताने भाषणादरम्यान आबे यांच्यावर मागून गोळी झाडल्याचे सांगण्यात येत आहे. संशयित हल्लेखोर 40 वर्षांचा आहे. 67 वर्षीय शिंजो लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी (एलडीपी) पक्षाशी संबंधित आहेत. आबे हे आक्रमक नेते मानले जातात. शिंजो यांना अल्सरेटिव्ह कोलायटिस हा एक आतड्याचा आजार होता ज्यामुळे त्यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आबे यांनी 2006, 2014, 2015 आणि 2017 मध्ये देशाला भेट देऊन भारताशी घनिष्ट संबंध प्रस्थापित केले.

भारतात आज राष्ट्रीय दुखवटा
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचे प्राणघातक हल्ल्यामध्ये निधन झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर भारत सरकारने आज शनिवारी एका दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. 2021 साली पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या आबे यांच्यावर एका सभेदरम्यान अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. आबे यांच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरुन शोक व्यक्त करतानाच राष्ट्रीय दुखवट्याची घोषणा केली.

जवळच्या मित्राला गमावले : पंतप्रधान मोदी
माझ्या फार जवळचे मित्र असणार्‍या शिंजो आबे यांच्या निधनामुळे मला शब्दांमध्ये मांडता येणार नाही एवढे दु:ख झाले आहे. आबे हे जागतिक स्तरावरील फार उंच व्यक्तीमत्व होते. ते एक उत्तम नेते आणि प्रशासक होते. जपानला आणि जगाला अधिक सुंदर बनवण्यासाठी त्यांनी त्यांचे आयुष्य खर्ची केले, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या जवळच्या मित्राला श्रद्धांजली अर्पण केली.

COMMENTS