Rāṣṭravādīcī आमदार संजय गायकवाड(Sanjay Gaikwad) यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या सडकून टीका केली आहे. शिवसेनेतील बंड पाहून खासदार संजय रा
Rāṣṭravādīcī
आमदार संजय गायकवाड(Sanjay Gaikwad) यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या सडकून टीका केली आहे. शिवसेनेतील बंड पाहून खासदार संजय राऊत यांनी यातील आमदारांना कुणाला डुक्कर म्हटलं, कुणाला रेडा म्हटलं, तर काही महिला आमदारांना वेश्या म्हटलं. काहींचे बाप काढले तसे आम्हीही त्यांचे बाप काढू शकतो…आम्ही 42 आमदारांनी संजय राऊत यांना मतदान केलं, त्यामुळे त्यांनी सांगाव आता हे 42 आमदार त्यांचे बाप आहेत का? त्यामुळे त्यांनी आधी आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि नंतर बोलावं. अशी सडसडून टीका आमदार संजय गायकवाड यांनी केली आहे.तर संजय राऊत हे राष्ट्रवादीची सुपारी घेऊन शिवसेना संपवायला निघाले होते, असाही आरोप त्यांनी यावेळी केला आहे.

COMMENTS