पुरेशा पावसाअभावी राज्यातील भूजल पातळीत घट

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुरेशा पावसाअभावी राज्यातील भूजल पातळीत घट

मुंबई : मान्सूनने संपूर्ण राज्य व्यापले असले तरी, अजूनही विविध जिल्ह्यात पुरेसा पाऊस पडलेला नाही. खरीपाच्या पेरण्या अजूनही झाल्या नसल्यामुळे शेतकरी ह

राहुल गांधी 22 तारखेला गुजरात दौर्‍यावर
विषारी इंजेक्शनमुळे पोलिस हवालदाराचा मृत्यू
पाट-पाण्याच्या आर्वतनांचे काटेकोर नियोजन करावे

मुंबई : मान्सूनने संपूर्ण राज्य व्यापले असले तरी, अजूनही विविध जिल्ह्यात पुरेसा पाऊस पडलेला नाही. खरीपाच्या पेरण्या अजूनही झाल्या नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याचप्रमाणे पुरेशा पावसाअभावी राज्यातील भूजल पातळीत मोठी घट झाली आहे.
मुंबईमध्ये देखील पाऊस न झाल्यामुळे 10 टक्के पाणीकपात करण्यात आली आहे. तर दुसरीकडे पुण्यातील धरणांमध्ये देखील अल्प पाणीपुरवठा आहे. आगामी काही दिवसांत जोरदार पाऊस न झाल्यास राज्यात पाण्याचे संकट उभे राहू शकते. राज्यातील पुणे, सातारा, नंदुरबार, जळगाव, धुळे, अमरावती या जिल्ह्यातील तब्बल 194 गावांतील भूजल पातळीत एक मिटरहून अधिक घट झाली आहे. येत्या काळात चांगला पाऊस न झाल्यास ही भूजल पातळी आणखी खोल जाण्याची शक्यता आहे. असल्याचे वरिष्ठानी माहिती दिली. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेद्वारे दरवर्षी ऑक्टोबर, जानेवारी, मार्च व मे महिन्यात पाणलोट क्षेत्रनिहाय निश्‍चित केलेल्या विहिरींमधील भूजल पातळीचा अभ्यास केला जातो. भूजलाची उपलब्धता मुख्यत्वे जून ते सप्टेंबर या कालावधीत पडणार्‍या नैऋत्य मोसमी पावसावर अवलंबून असल्यामुळे सप्टेंबरअखेर राज्यात पर्जन्यमान व ऑक्टोबरमधील भूजल पातळीच्या नोंदी घेतल्या जातात. त्याचा सरासरीच्या तुलनेत पर्जन्यमान व भूजल पातळीत झालेली वाढ अथवा घट यांचा तुलनात्मक अभ्यास करून राज्यातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईबाबत संभाव्य अनुमान काढले जात असल्याची माहिती भूजल अधिकार्‍यांकडून देण्यात आली.
गेल्या वर्षी सप्टेंबर 2021 अखेर 355 पैकी 270 तालुक्यांतील 85 तालुक्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत पावसात घट आढळून आलेली होती. पर्जन्यमानाचा थेट परिणाम भूजल पातळीवर होत असल्यामुळे त्याचा परिणाम सप्टेंबर 2021 अखेर 3660 निरिक्षण विहिरींद्वारे मोजण्यात आलेल्या भूजल पातळीच्या अभ्यासाआधारे राज्यातील 268 गावांमध्ये सरासरीच्या तुलनेत 1 मीटर पेक्षा जास्त भूजल पातळी खालावलेली आढळली असल्याचे दिसून आले. त्यापैकी 17 गावांमधील भूजल पातळीमध्ये 3 मीटर पेक्षा जास्त घट, 38 गावांमध्ये 2 ते 3 मीटर, तर 213 गावांमधील भूजल पातळीत 1 ते 2 मीटर एवढी घट आढळली. यंदा मार्च 2022 मधील भूजल पातळीचा तुलनात्मक अभ्यास ऑक्टोबर 2021 ते मार्च 2022 या कालावधीतील भूजल पातळीशी करण्यात आला. विविध कामासाठी झालेला भूजल उपसा व त्यामुळे भूजल पातळीत झालेला बदल या बाबतची माहिती मार्च 2022 मध्ये निरिक्षण विहिरींमधील घेतलेल्या स्थिर भूजल पातळीच्या अभ्यासावरून दिसून येते.

COMMENTS