पदाधिकारी व अधिकारी दालनात सीसीटीव्ही बसवा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पदाधिकारी व अधिकारी दालनात सीसीटीव्ही बसवा

मनपा आयुक्तांकडे मागणी

अहमदनगर/प्रतिनिधी : महापालिकेच्या सर्व विभाग प्रमुख, प्रभाग अधिकारी आदींसह महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती आदी पदाधिकार्‍यांच्या कार्यालयात व द

एक लाख रुपये न दिल्यास अश्‍लिल फोटो व्हायरल करेल
आईचे मरणोपरांत विधी टाळत विधायक कार्यास देणगी
गटनोंदणी फुटली …मुंबईचा हस्तक्षेप झाला सुरू

अहमदनगर/प्रतिनिधी : महापालिकेच्या सर्व विभाग प्रमुख, प्रभाग अधिकारी आदींसह महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती आदी पदाधिकार्‍यांच्या कार्यालयात व दालनात सीसीटीव्ही बसविण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे. लोककार्य व लोकक्रांती दलाचे अध्यक्ष हेमंत ढगे यांनी ही मागणी केली आहे. महापालिकेमध्ये नगरसेविकांचे पती किंवा मुले प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या पालिका कामकाजात हस्तक्षेप करत असल्याप्रकरणी शासनाने कारवाई करावी, अशी मागणी ढगे यांनी मागील वर्षी नगर विकास विभागाकडे केली होती. शासनाने याबाबत आयुक्तांना पत्र पाठविले होते. मात्र, नगरसेविकांचे पती किंवा मुले कामकाजात हस्तक्षेप करत असल्याची कोणतीही तक्रार नसल्याचे मनपाने स्पष्ट केले होते.त्यामुळे नगरसेविकांचे पती किंवा मुले हे संबंधित नगरसेविकांऐवजी स्वतः पालिका कामकाजात हस्तक्षेप करतात, हे पाहण्यासाठी पालिकेच्या सर्व विभाग प्रमुखांच्या आणि महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती व स्थायी समिती सभागृह, महिला व बालकल्याण समितीच्या केबिनमध्ये व अँटी चेंबरमध्ये, तसेच पालिकेच्या पहिल्या मजल्यावरील प्रवेशद्वाराच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवावेत, अशी मागणी ढगे यांनी केली आहे. महापालिकेकडे पैसे नसल्यास शासनाकडे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी निधीची मागणी करावी, असेही ढगे यांनी म्हटले आहे.

COMMENTS