अहमदनगर : एकाच दिवसात झाले 1338 कोरोना बाधित ; कोरोनाचा विस्फोट

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहमदनगर : एकाच दिवसात झाले 1338 कोरोना बाधित ; कोरोनाचा विस्फोट

नगर शहर व जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट झाला आहे.

चोरीस गेलेल्या बोअरच्या गाडीचा लागला तामिळनाडूत शोध
दिलीप कुडके यांचा पाथरवट समाजाच्या वतीने गौरव
कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जिंकून दाखवू

अहमदनगर/प्रतिनिधी- नगर शहर व जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. गुरुवारी एकाच दिवसात तब्बल 1338 कोरोना पॉझिटीव्ह जिल्ह्यात आढळले असून, त्यात नगर शहरातील तब्बल साडेचारशेवर रुग्ण आहेत. दरम्यान, नगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता नगरसह काही तालुक्यांतून लॉकडाऊन निर्बंध लागू होण्याची चिन्हे आहेत. 

अहमदनगर जिल्ह्यात गुरुवारी 660 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 82 हजार 96 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 93.20 टक्के इतके झाले आहे. मात्र, जिल्हयाच्या रुग्ण संख्येत 1338 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 4799 इतकी झाली आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक मानली जात आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 511, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 655 आणि अँटीजेन चाचणीत 172 रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 194, अकोले 39, जामखेड 25, कोपरगाव 45, नगर ग्रामीण 24, नेवासा 8, पारनेर 20, पाथर्डी 10, राहता 34, राहुरी 3, संगमनेर 31, शेवगाव 47, श्रीगोंदा 11, श्रीरामपूर 14 आणि कँटोन्मेंट बोर्ड 6 अशा रुग्णांचा समावेश आहे. खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 223, अकोले 27, कर्जत 3, कोपरगाव 55, नगर ग्रामीण 22, नेवासा 5,  पारनेर 12, पाथर्डी 1, राहाता 93,  राहुरी 15, संगमनेर 116, शेवगाव 8, श्रीगोंदा 3, श्रीरामपूर 51, कॅन्टोन्मेंट 7 आणि  इतर जिल्हा 14 अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत 172 जण बाधित आढळून आले. यात मनपा 40, अकोले 8, जामखेड 12, कर्जत 12, कोपरगाव 1, नगर ग्रामीण 5, नेवासा 11, पारनेर 14, पाथर्डी 19, राहाता 13, राहुरी 8, संगमनेर 1, शेवगाव 16, श्रीगोंदा 5, श्रीरामपूर 4, कॅन्टोन्मेंट 1, इतर जिल्हा 2 अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांमध्ये मनपा 238, अकोले 16, जामखेड 12, कर्जत 22, कोपरगाव 35, नगर ग्रामीण 26, नेवासा 31, पारनेर 19, पाथर्डी 31, राहाता 77, राहुरी 27, संगमनेर 57, शेवगाव 14,  श्रीगोंदा 7,  श्रीरामपूर 23, कॅन्टोन्मेंट 18 आणि इतर जिल्हा 7 अशा रुग्णांचा समावेश आहे.

चौकट

-बरे झालेली रुग्ण संख्या-82,096

-उपचार सुरू असलेले रुग्ण-4,799

-आतापर्यंतचे मृत्यू-1,189

-एकूण रुग्ण संख्या-88,084

-घराबाहेर पडताना चेहर्‍यावर मास्क अवश्य लावा

-प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा

-स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या

-अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्‍वास ठेवा

COMMENTS