अजित पवार यांचा इशारा; बदल्यांची कागदपत्रे दाखवण्याची तयारी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अजित पवार यांचा इशारा; बदल्यांची कागदपत्रे दाखवण्याची तयारी

कायदा आणि सुव्यवस्थेला किंवा पोलिस दलाच्या कामकाजाला गालबोट लावण्याचे काम कुणी करत असेल

प्रियदर्शनी मुंडे, पृथ्वीराज मुंडेचे अबॅकस आंतरराष्ट्रीय परिक्षेत यश
रांजणगावच्या सरपंचपदी संध्याताई देशमुख
महाराष्ट्र हॅकथॉनमध्ये अग्रणी टीम्सना पुरस्कार 

मुंबई / प्रतिनिधी : कायदा आणि सुव्यवस्थेला किंवा पोलिस दलाच्या कामकाजाला गालबोट लावण्याचे काम कुणी करत असेल, जनतेच्या मनातून पोलिस दलाला उतरवण्याचे काम कुणी करत असेल तर त्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. 

मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख रशीद यांच्या पक्ष प्रवेशासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेश कार्यालयात उपस्थित होते. या वेळी त्यांनी माध्यमांनी संवाद साधला. ते म्हणाले, की रश्मी शुक्लांचे पत्र काय आहे? सुबोध जैस्वाल यांचे पत्र काय आहे? बदल्यांच्या यादीबाबत बोलले जात ़आहे. मी आज प्रशासनात काम करत नाही. गेली 30 वर्षे प्रशासन सांभाळत आहे. जी वस्तुस्थिती आहे, जे खरे आहे, ते महाराष्ट्रातील जनतेसमोर शंभर टक्के येईल. काळजी करण्याचे कारण नाही. गेले काही दिवस राज्यात जे काही वातावरण तयार करण्यात आले, त्यामध्ये कुणालाही पाठिशी घातले जाणार नाही. चौकशा सुरू आहेत. एनआयएसुद्धा चौकशी करीत आहे. एटीएस चौकशी करीत होती; परंतु काल ठाणे न्यायालयाने एनआयएकडे तपास देण्यास सांगितले. आम्हाला भेदभाव करायचा नाही, मात्र काही बाबतीत चौकशी करण्याची गरज असेल तर केली जाईल, असे ते म्हणाले. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना फोन टॅपिंग प्रकरणाचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती अजितदादांनी दिली. रश्मी शुक्ला या राज्य गुप्त विभागाच्या तत्कालीन आयुक्त असताना, कोणतेही कायदेशीर अधिकार नसताना त्यांनी राज्यातील काही महत्त्वाच्या राजकीय व्यक्तींचे, सनदी अधिकार्‍यांचे; तसेच काही पत्रकारांचेही फोन टॅप केले होते काय, याचा माग आता सरकारकडून काढला जाणार आहे. हे संपूर्ण प्रकरण घडले, तेव्हा कुंटे हे गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदावर कार्यरत होते. त्यामुळे त्यांचा अहवाल महाविकास आघाडीसाठी गेमचेंजर ठरण्याची शक्यता आहे. विरोधकांनी कितीही आरडाओरड केली, आरोप केले, तरी राज्य सरकार नियमानुसार काम करत आहे. विरोधकांच्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही, असे सांगत राज्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित आहे, असे पवार म्हणाले. विरोधक सातत्याने राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करत आहे; पण मला त्यांना सांगायचे, की महाविकास आघाडीकडे पूर्ण बहुमत आहे. आमच्या मित्रपक्षाचे आमदार आमच्यासोबत आहे. साहजिकच महाविकास आघाडी पूर्ण बहुमताने सत्तेत आहे, असे त्यांनी सांगितले. 

रश्मी शुक्लांच्या चौकशीचे संकेत

अधिकारी बदल्यांच्या रॅकेटवरुन विरोधी पक्ष आरोप करतो आहे; पण त्या बदल्या झाल्याच नाहीत, असा दावा पवार यांनी केला आहे. ज्या बदल्यांबाबत शुक्लांच्या अहवालाचा आधार दिला जातो, त्या बदल्या झालेल्या नाही. या सगळ्या प्रकरणामध्ये ज्याचे नाव येईल त्याची चौकशी केली जाईल, असे सांगून शुक्ला यांच्या चौकशीचे संकेत पवार यांनी दिले.

COMMENTS