बंडखोर आमदारांच्या संपर्क कार्यालयाची तोडफोड

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बंडखोर आमदारांच्या संपर्क कार्यालयाची तोडफोड

ठाणे जिल्ह्यात 30 जूनपर्यंत संचारबंदीचे आदेश

मुंबई/पुणे : राज्यातील शिंदे गटाने स्वतंत्र गटाची स्थापना केल्यानंतर आणि पुन्हा पक्षात परतण्यास नकार दिल्यामुळे शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पह

विधानसभा निवडणूकीसाठी यंत्रणानी सज्ज रहावे : जितेंद्र डुडी
नारायण राणेंच्या बंगल्यावर होणार कारवाई
जोएल काॅची : मनाच्या कचऱ्य्याचा, विकृत निचरा!

मुंबई/पुणे : राज्यातील शिंदे गटाने स्वतंत्र गटाची स्थापना केल्यानंतर आणि पुन्हा पक्षात परतण्यास नकार दिल्यामुळे शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे शनिवारी पुण्यात शिवसेनेचे बंडखोर आमदार डॉ. तानाजी सावंत यांचे संपर्क कार्यालय फोडण्यात आले. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे उल्हासनगर येथील संपर्क कार्यालयाची तोडफोड करण्यात आली.
शिवसेनेच्या 35 पेक्षा जास्त आमदारांनी एकनाथ शिंदेंना समर्थन दिले आहे. त्यामुळे शिंदेंविरुद्ध उद्धव ठाकरे अशी स्थिती सध्या पहायला मिळत आहे. बंडामुळे आता शिवसेनेचे कार्यकर्तेही एकनाथ शिंदेवर नाराज झाले आहेत. आक्रमक झालेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या पुण्यातील कार्यालयाची तोडफोड केली आहे. पुण्यातील बालाजीनगर येथे शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांचे मे. भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेडचे कार्यालय आहे. तानाजी सावंत यांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा देत बंडखोर आमदारांच्या गटात सामील झाले आहेत. त्यामुळे आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड करत राडा घातला. ज्या आमदारांनी बंड केले आहे. ते शिवसेनेमुळे मोठे झाले आहे. त्या सर्वांनी हे विसरता कामा नये. जे आमदार तिकडे गेले आहेत त्या सर्वांनी पुन्हा यावे, अन्यथा आज तानाजी सावंत यांच्या ऑफिसची अवस्था झाली आहे. तशी राज्यातील अनेक बंडखोर आमदारांची होईल, असा इशारा शिवसेनेचे माजी नगरसेवक विशाल धनवडे यांनी दिला आहे. कुर्ल्याचे शिवसेना आमदार मंगेश कुडाळकरांच्या कार्यालयावर काही लोकांनी हल्ला केला. त्यांनी गेटची तोडफोड केली. अहमदनगरमध्ये बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे यांच्या फोटोला काळे फासण्यात आले. तोडफोड करणारे लोक शिवसेनेचे असल्याचा आरोप बंडखोर आमदारांच्या समर्थकांनी केला आहे. तोडफोडीच्या घटनेनंतर पोलिसांनी राज्यात हाय अलर्ट जारी केला आहे. ठाण्यात कायदा व सुव्यवस्था कडेकोट करण्यात आली असून, परिसरात शांतता राखण्यासाठी विविध निर्बंध लादण्यात आले आहेत. एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातील हिंसाचार आणि कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती पाहता पुढील 5 दिवस 30 जूनपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परिसरात लाठ्या, शस्त्रे, पोस्टर जाळणे, पुतळे जाळणे यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय घोषणाबाजी किंवा स्पीकरवर गाणी वाजवण्यासही परवानगी नाही.

जशास तसे उत्तर दिले जाईल : तानाजी सांवतचा इशारा
बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या पुण्यातील कार्यालयाची शिवसैनिकांनी तोडफोड करत सावंतांविरोधात घोषणाबाजीही केली. तानाजी सावंत यांनी फेसबुक पोस्ट करत तोडफोड करणार्‍या शिवसैनिकांना इशारा दिला आहे. ‘प्रत्येकाने आपल्या लायकीत रहावे, वेळ आल्यावर जशास तसे उत्तर दिले जाईल’, असे सावंत म्हणाले. ‘आमचे गटनेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही संयम बाळगून आहोत. एकदा हा राजकीय प्रश्‍न सुटला की येणार्‍या काळात जशाच तसे उत्तर दिले जाईल. माझी नम्र विनंती आहे प्रत्येकाने आपल्या औकातीत राहावे.’ असा सज्जड दमच सावंत यांनी दिला आहे.

COMMENTS