राजकीय पेचात सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करावा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राजकीय पेचात सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करावा

काँग्रेस नेत्या जया ठाकूर यांची याचिका

नवी दिल्ली : राजीनामा दिलेल्या किंवा विधानसभेतून अपात्र ठरलेल्या आमदारांना निवडणूक लढवण्यास पाच वर्षांची बंदी घालावी, तसेच महाराष्ट्रात सध्या सुरू अस

चेंबरमधे गुदमरून दोन मजुरांचा मृत्यू
‘ईडी’ने कन्नड साखर कारखाना केला जप्त
जगात कोरोनाच नाही त्यामुळे मी ही मास्क घालत नाही : ना. जयंत पाटील

नवी दिल्ली : राजीनामा दिलेल्या किंवा विधानसभेतून अपात्र ठरलेल्या आमदारांना निवडणूक लढवण्यास पाच वर्षांची बंदी घालावी, तसेच महाराष्ट्रात सध्या सुरू असलेले राजकीय संकट पाहता सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करावा, अशा मागण्या मध्य प्रदेशातील काँग्रेसच्या नेत्या जया ठाकूर यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिकेद्वारे केल्या आहेत. महाराष्ट्रात शिवसेना नेते मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षाविरोधात पुकारलेले बंड, त्यामुळे सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर ठाकूर यांनी सदर याचिका दाखल केली आहे.
ठाकूर यांनी अर्जात म्हटले आहे की, गेल्या वर्षी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पक्षांतरविरोधी कायद्याला बगल देऊन राजकीय पक्ष सरकार कसे पाडत आहेत, असे या याचिकेत नमूद करण्यात आले आहे. विधानसभेचा राजीनामा देणार्‍या आमदारांना पोटनिवडणूक लढवण्यासाठी तिकीट मिळते, तसेच ते नव्या सरकारमध्ये मंत्रीही होतात. यावर ठाकूर यांनी याचिकेद्वारे आक्षेप घेतला आहे. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली असल्याचे ठाकूर यांनी म्हटले आहे. मात्र सरकारने अद्याप त्यावर आपले उत्तर दाखल केलेले नाही. ज्याचा विविध राजकीय पक्ष सातत्याने गैरफायदा घेत आहेत. त्यामुळे त्यांना या मुद्द्यावर पुन्हा न्यायालयात जावे लागले आहे. महाराष्ट्रातील राजकीय संकटाचा उल्लेख करताना, राजकीय पक्ष देशाची लोकशाही संरचना बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे या प्रकरणात न्यायालयाच्या हस्तक्षेपाची नितांत गरज आहे, असेही ठाकूर यांनी म्हटले आहे.

COMMENTS