Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अग्निपथ योजनेचा वाळवा तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निषेध

इस्लामपूर / प्रतिनिधी : भाजपा केंद्र सरकारने युवकांच्या सैन्य भरतीसाठी आणलेल्या अग्निपथ योजनेचा वाळवा तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने

पक्षाच्या बळकटीसाठी कार्यकर्त्यांनी निष्ठेने काम करावे : ना. जयंत पाटील
ओम कदम याला बॉक्सिंगमध्ये सुवर्ण पदक
सावंतवाडीत आठवड्यापासून बिबट्याचा मुक्काम

इस्लामपूर / प्रतिनिधी : भाजपा केंद्र सरकारने युवकांच्या सैन्य भरतीसाठी आणलेल्या अग्निपथ योजनेचा वाळवा तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने इस्लामपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या साक्षीने तीव्र निषेध करण्यात आला. केंद्र सरकारने ही योजना रद्द करावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस या योजनेस शेवटपर्यंत तीव्र विरोध करेल, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. युवक कार्यकर्त्यांनी भाजपा केंद्र सरकार, अग्निपथ योजनेच्या विरोधातील घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संग्राम जाधव, कार्याध्यक्ष देवराज देशमुख, इस्लामपूर शहराध्यक्ष सचिन कोळी, कार्याध्यक्ष स्वरूप मोरे, आष्टा शहराध्यक्ष शिवाजी चोरमुले यांनी निषेध मोर्चाचे नेतृत्व केले. यावेळी राष्ट्रवादीचे राज्य चिटणीस अ‍ॅड. चिमणभाऊ डांगे, तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, शहराध्यक्ष शहाजी पाटील, खंडेराव जाधव, राज्य सरचिटणीस अरुण कांबळे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष संजय पाटील, संचालक विराज शिंदे, माणिक शेळके प्रामुख्याने उपस्थित होते.
विजयराव पाटील म्हणाले, अग्निपथ योजनेच्या विरोधात देशातील युवकांच्याकडून तीव्र आंदोलन करून विरोध केला जात आहे. केंद्र सरकारने ही योजना रद्द करावी. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस व युवक कार्यकर्ते स्वस्थ बसणार नाहीत.
अ‍ॅड. चिमणभाऊ डांगे म्हणाले, देशात 10 कोटी युवक आहेत. त्यातील फक्त 46 हजार युवकांची दरवर्षी भरती करून वर्षाला 4 हजार 600 युवकांना नोकरीत कायम करणार म्हणजे ही देशातील युवकांची चेष्टा आहे.
संग्राम जाधव म्हणाले, अग्निपथ ही योजना देशातील युवकांची फसवणूक करणारी योजना आहे. तुम्ही 17 व्या वर्षी नोकरी देणार त्यानंतर 4 वर्षांनी त्याने बेरोजगारच राहिले पाहिजे. वर्षाला 2 कोटी नोकर्‍यांचे काय झाले?
देवराज देशमुख म्हणाले, भाजपाचे केंद्र सरकार हे देशातील पहिले गोंधळलेले सरकार आहे. त्यांनी जीएसटी, नोटा बंदी, कृषीसारखे जे-जे कायदे केले. त्यामध्ये देशातील जनतेचे नुकसानच झाले. कृषी कायद्यासारखे अग्निपथ योजना रद्द केली नाही, तर देशातील युवक यांना रस्त्यावर फिरू देणार नाहीत.
खंडेराव जाधव म्हणाले, ईस्ट इंडिया कंपनीने व्यापार करीत देश लुटला. आता भाजपावाले अदानी आणि अंबानीला देश विकायला निघाले आहेत. अग्निपथ हा केवळ युवकांचा प्रश्‍न नसून देशाच्या संरक्षणाचाही प्रश्‍न आहे. जोपर्यंत ही योजना रद्द होत नाही, तोपर्यंत स्वस्त बसायचे नाही.
अरुण कांबळे म्हणाले, मर जवान, मर किसान हे भाजपा केंद्र शासनाचे धोरण आहे. देश व देशाचे संविधान वाचविण्यासाठी यांना सत्तेवरून पायउतार करायला हवे.
यावेळी संचालक माणिक शेळके, आष्टा शहराध्यक्ष शिवाजी चोरमुले, पदवीधरचे राज्य सरचिटणीस विशाल सुर्यवंशी, युवक राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष संदीप पाटील, सोशल मिडियाचे तालुकाध्यक्ष सुशांत कोळेकर, सुशांत कुराडे, रणधीर पाटील, प्रणव जाधव, सुहास पवार यांच्यासह अनेक युवक कार्यकर्त्यांनी आपल्या अग्निपथ विरोधातील तीव्र भावना व्यक्त केल्या.
यावेळी माणिक पाटील, विनायक यादव, धैर्यशील थोरात, अजित बेनाडे, महेश पाटील, संतोष पाटील, माही पाटील, अभिजित पाटील, विक्रम पाटील, विशाल माने, जुबेर खाटीक, सारंग भोसले, राहुल नागे, रणजित तेवरे, सुशांत पाटील, सुहास खोत तसेच सुहासकाका पाटील, अर्जुन माने, सुरगोंड पाटील, प्रा. दीपक मेथे, विजय देसाई यांच्यासह युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS