संगमनेरमध्ये ईडीविरोधात काँग्रेसचे धरणे आंदोलन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संगमनेरमध्ये ईडीविरोधात काँग्रेसचे धरणे आंदोलन

संगमनेर/प्रतिनिधी : देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देश उभारणी अत्यंत मोलाचे योगदान देणार्‍या गांधी कुटुंबाला सूडबुद्धीने जाणी

शेतकर्‍यांना अग्रिम पीकविमा देण्यासाठी सुनावणी घ्या
आनंदऋषीजी महाराज प्रतिमेची पालखी मिरवणूक
फोफसंडीत विशेष गुणगौरव व काव्यमैफल कार्यक्रम सोहळा उत्साहात

संगमनेर/प्रतिनिधी : देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देश उभारणी अत्यंत मोलाचे योगदान देणार्‍या गांधी कुटुंबाला सूडबुद्धीने जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. खासदार राहुल गांधी हे शूर योद्धे असून ते कधीही सरकारला शरण जाणार नाही. महागाई, बेरोजगारी , ढासळलेली अर्थव्यवस्था हे अपयश झाकण्यासाठी केंद्र सरकारकडून सूडबुद्धीने विरोधी पक्षांच्या नेत्यांवर ईडीच्या कारवाया होत असल्याची टीका नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले असून खा. राहुल गांधी व खा. सोनिया गांधी यांना ईडीने पाठवलेल्या नोटीस विरोधात संगमनेर मध्ये काँग्रेसच्या वतीने भव्य धरणे आंदोलन करण्यात आले.
संगमनेर बस स्थानक येथे संगमनेर तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने खा. राहुल गांधी व काँग्रेस पक्षाध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांना पाठवलेल्या ईडी नोटीसच्या निषेधार्थ धरणे आंदोलन झाले. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ, नगराध्यक्षा स दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, शंकर पा. खेमनर, लक्ष्मणराव कुटे, नवनाथ आंधळे, अजय फटांगरे, माधवराव हासे आदींसह काँग्रेसच्या सर्व सेलचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, सध्या देशात ईडी, सीबीआय या यंत्रणा सरकार पेक्षा जास्त कार्यान्वित झाले आहे. लोकविकासाचे कामे करणे ऐवजी जनतेमध्ये मतभेद निर्माण केली जात आहेत. विरोधी राजकीय पक्षांना नामशेष करण्याचा हा प्रकार सुरू आहे. गांधी कुटुंब हे देशासाठी त्याग करणारे कुटुंब आहे भारत जोडो यात्रा सोनिया गांधी यांनी सुरु केली आणि मोदी सरकारने घाबरून त्यांना ईडीच्या नोटिसा पाठवल्या आहेत हे अत्यंत निंदनीय असल्याचे त्या म्हणाल्या. या वेळी रामहरी कातोरे, प्रा. बाबा खरात, सुनीताताई कांदळकर, भास्कर शेरमाळे, सुभाष सांगळे, मिलिंद कानवडे, दत्तू कोकणे गौरव डोंगरे आदींनी मोदी सरकारच्या कारभारावर टीका केली. यावेळी भारत मुंगसे, राजेंद्र कहांडळ, रावसाहेब कोटकर, के.के. थोरात, सुहास आहेर, गणेश गुंजाळ, सिताराम वर्पे, हैदर शेख, तालुका काँग्रेस, शहर काँग्रेस यांचे संगमनेर तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी युवक कार्यकर्ते नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी मोदी सरकार हाय हाय, केंद्र सरकार काँग्रेसचे डरती है, ईडीको आगे करती है. अशा प्रकारच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता

गांधी परिवारावर सूडबुद्धीने कारवाई
यावेळी बोलताना आमदार डॉ. तांबे म्हणाले की, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देश उभारणीत गांधी व नेहरू कुटुंबाचे मोठे योगदान आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वतःची सर्व संपत्ती देशाकरता दान केली होती. स्वर्गीय इंदिरा गांधी व राजीव गांधी यांनी देशाच्या एकात्मतेसाठी प्राणांची आहुती दिली. मात्र त्याचे परिवाराला टार्गेट करून सूडबुद्धीने खा. सोनिया गांधी व राहुल गांधी यांना नोटिसा पाठवल्या जात आहे. सध्या देशात अत्यंत अस्थिरता निर्माण झाली आहे. महागाईने उच्चांक गाठला आहे. बेरोजगारी वाढली आहे. केंद्र सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले असून हे अपयश झाकण्यासाठी सीबीआय व तत्सम केंद्रीय यंत्रणांचा वापर केंद्र सरकार करत आहे.

COMMENTS