चार हजार विद्यार्थी शाळेत आलेच नाहीत

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चार हजार विद्यार्थी शाळेत आलेच नाहीत

जिल्हा परिषदेकडून कारणांचा शोध सुरू

अहमदनगर/प्रतिनिधी : यंदाच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात होताना जिल्ह्यात सुमारे चार हजार विद्यार्थी शाळेत आलेच नाहीत. यात सर्वाधिक श्रीगोंदा तालुक्याती

आजी-आजोबा मुलांच्या आयुष्यातील संस्काराचे ज्ञानपीठ ः उंडे
माध्यमकर्मींसाठी आत्मा मालिक राबविणार आरोग्य सुरक्षा योजना
“पुष्पा” अवतरला नगरमध्ये ; चंदनाची वाहतूक: दोघांच्या क्राइम ब्रँचने आवळल्या मुसक्या | LOKNews24

अहमदनगर/प्रतिनिधी : यंदाच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात होताना जिल्ह्यात सुमारे चार हजार विद्यार्थी शाळेत आलेच नाहीत. यात सर्वाधिक श्रीगोंदा तालुक्यातील 814 विद्यार्थी पात्र असतानाही शाळेत दाखल न झालेली तर कोपरगाव आणि कर्जतमधील दाखल पात्र असणार्‍या सर्व विद्यार्थ्यांचा शाळेत आलेल्यांमध्ये समावेश आहे. शाळेत दाखल न झालेल्या विद्यार्थ्यांची नेमकी संख्या 3 हजार 928 असून यातील बहुतांश मुले शिक्षकांच्या गृहभेटीत शाळा प्रवेशासाठी पात्र ठरली होती. तर काहींबाबत मात्र त्यांचे वय कमी असल्याचा अंदाज आहे. मात्र, आता जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून ही मुले शाळेत का आली नाही, याचे माहिती संकलन सुरू करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील शाळांतून यंदा जिल्ह्यात पहिलीसाठी दाखल पात्र विद्यार्थ्यांची संख्या 38 हजार 926 होती. प्रत्यक्षात बुधवारी शाळेच्या पहिल्या दिवशी 33 हजार 99 विद्यार्थीच शाळेत दाखल झाले. तर 1 हजार 909 विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळा सोडून अन्य शाळेत दाखल झाले असून उर्वरित 3 हजार 928 विद्यार्थी हे कोणत्याही शाळेत दाखल झालेले नाहीत. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 3 हजार 569 शाळा आहेत. दरम्यान, शाळेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. काही ठिकाणी त्यांची प्रभात फेरी झाली तर काही ठिकाणी ढोल-ताशांच्या गजरात बैलगाडी व ट्रॅक्टर ट्रॉलीतून त्यांच्या मिरवणुका काढण्यात आल्या. हातात फुगे व डोक्यावर रंगीत कागदी टोप्या यामुळे विद्यार्थ्यांमध्येही उत्साह होता. शाळेत आल्यावर त्यांना गुलाबाची फुले दिली गेली तसेच शालेय गणवेश व पुस्तकांचे वाटप होऊन गोड जेवण दिले गेले. त्यामुळे विद्यार्थ्यांचे चेहरे फुलले होते.
जिल्ह्यात 15 जूनपासून पहिली ते 12 वी पर्यंतच्या सर्व माध्यमांच्या आणि व्यवस्थापनाच्या शाळा सुरू झाल्या आहेत. या शाळा सुरू होत असताना सर्वांच्या नजरा या जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिलीत दाखल होणार्‍या विद्यार्थ्यांवर होत्या. शाळा उघडण्याआधी उन्हाळ्याच्या सुट्टीत शिक्षकांद्वारे त्यांच्या नेमणुकीच्या ठिकाणच्या संबंधित गावात सर्वेक्षण करून पहिलीसाठी पात्र असणार्‍या विद्यार्थ्यांची यादी करीत असतात. त्यानुसार जिल्ह्यात पहिलीसाठी 38 हजार 926 दाखल पात्र विद्यार्थी होते. या मुलांचे वय डिसेंबर 2021अखेर सहा वर्षे पूर्ण झालेले असल्याने त्यांना पहिलीसाठी दाखल पात्र विद्यार्थी ठरविण्यात आले होते. प्रत्यक्षात शाळा सुरू झाल्यावर यातील 3 हजार 928 विद्यार्थी कोणत्याच शाळेत दाखल झाले नसल्याचे शिक्षण विभागाच्या अहवालावरून समोर आले आहे.
एकतर यातील काही मुले इंग्रजी शाळेकडे वळले असण्याची शक्यता आहे अथवा या मुलांचे वय सहा वर्षापेक्षा कमी असल्याने ही मुले शाळेत दाखल होऊ शकलेली नाहीत, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. मात्र, येत्या 15 दिवसात या मुलांना शाळेत प्रवेश मिळू शकतो, यामुळे यातील काही मुले त्या कालावधीत शाळेत दाखल होतील असा अंदाज शिक्षण विभागाला आहे. विशेष म्हणजे कर्जत आणि कोपरगाव तालुक्यात पात्र असणारी सर्व मुले शाळेत दाखल झालेली आहेत.

शाळेत न आलेली मुले
अकोले 138, जामखेड 161, नगर 248, नेवासा 156, पारनेर 350, राहाता 494, पाथर्डी 368, राहुरी 501, संगमनेर 220, शेवगाव 235, श्रीगोंदा 814, श्रीरामपूर 243 यांचा समावेश आहे. जिल्ह्यात शाळेच्या पहिल्या दिवशी प्राथमिक शिक्षण विभागाने शाळा भेटीचे नियोजन केले होते. यात 318 साधन व्यक्ती, विशेष तज्ज्ञ, विशेष शिक्षकांनी, 166 केंद्र प्रमुखांनी, 75 विस्तार अधिकार्‍यांनी, 25 ठिकाणी गटशिक्षणाधिकार्‍यांनी तर जिल्हास्तरावरील अधिकार्‍यांनी 56 ठिकाणी शाळांना भेटी देवून विद्यार्थ्यांचे स्वागत करीत शाळांमधील सुविधा, कोविड नियमांचे पालन होते नाही, याची पाहणी केली.

COMMENTS