राजूर प्रतिनिधी ः अकोले तालुक्याचे आमदार डॉ. किरणजी लाहमटे यांचा जनता दरबार सध्या तालुक्यात जोरदार चर्चेचा विषय बनला आहे. दर गुरुवारी अकोले पक्ष कार्
राजूर प्रतिनिधी ः अकोले तालुक्याचे आमदार डॉ. किरणजी लाहमटे यांचा जनता दरबार सध्या तालुक्यात जोरदार चर्चेचा विषय बनला आहे. दर गुरुवारी अकोले पक्ष कार्यलाय व राजूर येथे दर सोमवारी आमदार लहामटे यांच्या निवासस्थानी अकोले शहराचा जनता दरबार दर गुरुवारी ठेवण्यात आला आहे.
सामान्य जनतेचे विविध कामे या जनता दरबारात मार्गी लागतात. त्यामुळे या जनता दरबाराला चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. राजूर येथे आमदार किरण लाहमटे यांच्या निवास स्थानी दर सोमवारी जनता दरबार भरतो. त्या जनता दरबारात अनेक सर्वसामान्य जनतेचे प्रशन आमदार साहेब सोडवतात त्यामुळे जनता दरबाराची जोरावर चर्चा तालुक्यात पसरली दर सोमवारी साधारणपणे दिवसभरात चारशे ते पाचशे जनतेचे प्रश्न आमदार सोडवतात. सामान्य जनतेची कामे आमदार स्वतः अनेक अधिकार्यांना फोन लावून तात्काळ मार्गी लावतात. त्यामुळे सामान्य जनतेचा कल या जनता दरबारी वाढताना दिसत आहे.
COMMENTS