Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खेलो इंडिया यूथ गेम्स; आर्चरीमध्ये आदितीचा सुवर्णवेध तर पार्थ कोरडेला रौप्यपदक

चंदीगड / प्रतिनिधी : पंजाब युनिर्व्हिसिटीच्या मैदानावर झालेल्या आर्चरीमध्ये सातार्‍याच्या आदिती स्वामी हिने सुवर्णवेध घेतला. कम्पाउंड राऊंडमध्ये

निळवंडे कालव्यांना गती देवून, शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोचवा : ना. आशुतोष काळे
संगमनेरात अनधिकृतपणे बायोडिझेलची विक्री करणाऱ्या सहा जणांना केले गजा आड
संगमनेर तहसीलदारांना जीवे मारण्याची धमकी

चंदीगड / प्रतिनिधी : पंजाब युनिर्व्हिसिटीच्या मैदानावर झालेल्या आर्चरीमध्ये सातार्‍याच्या आदिती स्वामी हिने सुवर्णवेध घेतला. कम्पाउंड राऊंडमध्ये तिने हे यश मिळवले. अहमदनगरच्या पार्थ कोरडे याचे सुवर्णपदक थोडक्यात हुकले. त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
आदितीने पंजाबच्या अवनित कौर हिचा पराभव केला. आदितीचा स्कोर 144 होता तर अवनित 137 गुणांवर होती. आदितीने घेतलेल्या आघाडीमुळे महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळाले. ती सातार्‍याच्या दृष्टी अ‍ॅकॅडमीत सराव करते. प्रवीण सावंत हे तिचे मार्गदर्शक आहेत. दुसरे पदक अहमदनगरच्या पार्थने मिळवून दिले. पार्थ आणि आंध्र प्रदेशच्या व्यंकीसोबत अंतिम सामना झाला. पार्थची सुरूवात खराब झाली. त्यामुळे तो काहीसा पिछाडीवर पडला. शेवटी पार्थ स्कोर होता 144 तर आंध्र प्रदेशच्या व्यंकी अवघा एका गुणाने (145) पुढे राहिला. त्यामुळे त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तो अहमदनरमधील अभिजीत दळवी यांच्या अ‍ॅकॅडमीचा खेळाडू आहे. इतर स्पर्धकांना पदकापर्यंत पोचता आले नाही. नीतू इंगोले (अमरावती) या आर्चरी संघाच्या प्रशिक्षक होत्या.
बॉक्सिंगमध्ये मुलांची फाईट
बॉक्सिंगमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चांगलीच लढत दिली. तब्बल नऊ खेळाडूंनी सेमीफायनल गाठली. सिमरन वर्मा, रिशिका होले, साई डावखर, आदित्य गौंड, माणिक सिंग, कुणाल घोरपडे, सुरेश विश्‍वनाथ, विजयसिंग, व्हिक्टर सिंग यांनी विविध गटांतील सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. त्यातील व्हिक्टर सिंग हिने सकाळी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. उर्वरित सामने होत आहेत. त्यांना प्रशिक्षक सतीश भट, विजय डोबाळे, सागर जगताप यांचे मार्गदर्शन मिळाले.

COMMENTS